आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनलाइन फंडा: इ-संदेशाच्या देवाण-घेवाणीने झिंगणार यंदाची ‘गटारी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दिवाळी, दसरा, पाडवा यासारख्या सणांना शुभेच्छापत्र मिळाले तर नवल नाही. पण कोणी तुम्हाला गटारी अमावस्येच्या शुभेच्छा दिल्या तर. विचित्र वाटतंय ना? होय. यंदा इ-मेलवर अशा प्रकारच्या शुभेच्छा मिळू शकतात. काही कंपन्यांनी आता गटारी अमावस्येच्या शुभेच्छापत्रांचा ऑनलाइन फंडा शोधून काढला आहे. या शुभेच्छा वाचून न पिताही ‘चिंग’ होण्याची अनुभूती मिळू शकते हे विशेष.

सणांच्या दिवशी शुभेच्छांचा अक्षरश: भडिमार होत असतो. पूर्वी भेटकार्डद्वारे शुभेच्छा दिल्या जात असत. भेटकार्ड खरेदी करणे खर्चिक वाटू लागल्यानंतर एसएमएसचा फंडा निघाला आणि फेस्टिव्हल ऑफरच्या नावाने एसएमएसची मोठय़ा प्रमाणात आदानप्रदान सुरू झाली.

‘कोंबडीचा रस्सा, मटणाची साथ
मच्छीची आमटी, बिर्याणीचा भात
खाऊन घ्या सगळे,
श्रावण महिन्याच्या आत.’

अशा काही भन्नाट संदेशांनी मोबाइल ग्राहक गटारीच्या शुभेच्छा देऊ लागले आहेत. याला सर्वत्रच मोठी मागणी मिळू लागली. हे पाहून मोबाइल कंपन्यांनी ‘ब्लॅक आउट डे’चा फंडा शोधून काढला. त्याद्वारे ग्राहकांची लूट सुरू झाली. यावर मोबाइल एसएमएसद्वारे शुभेच्छा देणार्‍या ग्राहकांनी व्हॉट्स अँपच्या पर्यायाला पसंती दर्शविली. एकूणच सोशल नेटवर्कद्वारे गेल्या काही दिवसांपासून पाटर्य़ांचे फोटो आणि गटारीच्या विनोदांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही नेट कंपन्यांनी गटारीच्या शुभेच्छापत्रांची क्लृप्ती शोधून काढली आहे. या शुभेच्छापत्रांवर कोंबडी, बोकड, मांसाहार, मद्याच्या बाटल्या आदींचे काटरुन्स एकापाठोपाठ एक अवतरतात. गटारीच्या शुभेच्छा देणारे संदेशही त्यावर देण्यात आले आहेत, जसे
‘संपली केव्हाच आषाढीची वारी
चला आता जोरात करू तयारी
थोडेसच दिवस हातात आहेत,
जोरात साजरी करू या गटारी .’
अशा संदेशांनी यंदाची गटारी अमावस्याही साजरी होणार आहे. तेव्हा इंटरनेट कनेक्ट केल्यावर तुमच्या मेल बॉक्समध्ये एखादा झणझणीत आणि चिंग संदेश धडकला, तर नवल वाटू देऊ नका.

31 डिसेंबरप्रमाणे गटारीलाही ग्राहकांसाठी बसण्याची जास्तीची व्यवस्था केली आहे. यासह मांसाहारासह शाकाहाराचे खमंग पदार्थ तयार ठेवले जाणार आहे. गटारीनिमित्त हॉटेलात येणारे तसेच पार्सलचे ग्राहक अधिक असतात.
-रवींद्र भोळे, व्यवस्थापक हॉटेल सुयोग

आज होतील हॉटेल फुल्ल
येत्या मंगळवारी दर्श अमावस्या असून त्यानंतर र्शावण महिन्याला प्रारंभ होत आहे. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे र्शावण महिन्याला धार्मिक महत्त्व असल्याने या काळात मांसाहार वज्र्य करण्याची प्रथा आहे. त्यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गटारी अमावस्येला मांसाहार करण्याची पद्धत गेल्या काही वर्षापासून रूढ झाली आहे. यंदा गटारी अमावस्या मंगळवारी येत आहे. या दिवसापर्यत भरपेट मांसाहार करण्यासाठी सर्वच हॉटेल्समध्ये गर्दी दिसत आहे. रविवारचा मुहूर्त साधत तर दुपारपासून हॉटेल्स फुल्ल झाले होते. सोमवारच्या दिवशी अनेक लोक मांसाहार करीत नसल्याने यातील अनेकांनी आपली सोमवारची भूक रविवारीच भागवून घेतली.