आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅदरींगचा निधी दुष्काळग्रस्तांना, नूतन मराठा महाविद्यालयाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याच्यावेळी होणारे स्नेहसंमेलन रद्द करून त्यातून वाचवलेले ३१ हजार रुपये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा कौतुकास्पद निर्णय नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. लवकरच ही रक्कम फंडात जमा करण्यात येणार अाहे. या अभिनव निर्णयाचे सर्वत्र काैतुक हाेत अाहे.
नूतन मराठा महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ १६ जानेवारी राेजी अायाेजित करण्यात अाला आहे. त्याच्या काही दिवसांनंतर स्नेहसंमेलन घेण्यात येते. त्यासाठी महाविद्यालयाकडून ८० हजार रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यात स्नेहसंमेलनाला येणारा ३१ हजार रुपयांचा खर्च करता ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी, असा विचार विद्यापीठ महाविद्यालय प्रतिनिधी गजाला शेख हिच्या मनात आला. त्यांनी बैठक घेऊन हा विचार प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्यासमोर मांडला. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत त्याला लागलीच हाेकार दिला. त्यामुळे ३१ हजार रुपये हे अाता लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केले जाणार आहेत. या अभिनव निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत होत आहे.

प्रत्येक वर्गात जाऊन दिली माहिती
स्नेहसंमेलनाचा निधी दुष्काळग्रस्तांना देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या वर्गात जाऊन संमती घेण्यात आली. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केेले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून मोमेंटो जिंकले असते. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मदत केल्याचा हा प्रसंग आयुष्यभर स्मरणात राहील, अशी माहिती विद्यापीठ प्रतिनिधी गजाला शेख प्राचार्य डॉ.देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी श्रीराम शिंपी, उज्ज्वला पाटील, आशा पाटील, पूजा बाविस्कर, देवश्री पाटील, अमन बिऱ्हाडे ऋची निंबाळकर उपस्थित होते.