आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातोश्री विद्यालयात स्नेहसंमेलन रंगले, विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रबोधन संस्था संचलित आहुजानगरमधील मातोश्री प्राथमिक विद्यालयात शुक्रवारी विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्काराने स्नेहसंमेलनात रंग भरला. रेकॉर्ड डॉन्स, एकांकिका, नाटकांसह विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. 

प्रारंभी ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक त्र्यंबक कापडे, निवृत्त पोलिस निरीक्षक श्याम तरवडकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, दिलीप सोनार, संस्थेचे समन्वयक नितीन विसपुते, संस्थेच्या अध्यक्षा आरती जयप्रकाश बाविस्कर, मुख्याध्यापक समाधान इंगळे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ केला. समाधान इंगळे यांनी प्रास्ताविकात शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती दिली. निवासी संपादक त्र्यंबक कापडे यांनी टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, या म्हणी संबंधी गोष्ट सांगून मुलांना खिळवून ठेवले. सागर शिंपी यांनी आपल्या जीवनात एक सुजाण नागरिक बनवण्याचे मुलांना अावाहन केले. यानंतर लिंबू चमचा, संगीत खुर्चीसह विविध स्पर्धांमध्ये पूजा मराठे, संगीता कोळी, विठ्ठल सपकाळे, विनोद सोळुंके, पूजा चव्हाण, पुरुषोत्तम पाटील यांनी यश मिळवले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वर्षभरातील विविध उपक्रमातील यशासह विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. चेतन चौधरी, रामचंद्र पाटील, किरण पाटील, खुशी तायडे, अशोक मालचे, संतोष चौधरी यांनी पारिताेषिक पटकावले. 

मुलांनी कलाप्रकार केले सादर 
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे रेकाॅर्ड डान्स, एकांकिका, नाटकांमध्ये आपला कलाविष्कार सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. सुमित इंगळे, प्रियंका मालचे, धीरज कोळी, हर्षदा धांडे यांनी सूत्रसंचालन केले. लीना नन्नवरे हीने आभार मानले. वैशाली पाटील, शारदा मोहिते, प्रमोद झलवार, मिलिंद नाईक, कविता गावित, सुनीता बैस, सुरेखा पाटील, सरला पाटील, विनोद चव्हाण, संदीप राठोड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. 

मातोश्री प्राथमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात वार्षिक पारितोषिक वितरण करताना ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक त्र्यंबक कापडे. समवेत श्याम तरवडकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, नितीन विसपुते आदी.