आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांची लूट: राज्यात जेनरिक अाैषधांची ‘ब्रँड’च्या नावाखाली विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यात जेनरिक अाैषधांची विक्री ब्रँडच्या नावाखाली हाेत अाहे. यामुळे जेनरिक अाणि ब्रँडेडमधील फरकच समजत नाही. जेनरिकच्या कमी किमतीचा संपूर्ण फायदा ग्राहकांपर्यंत जाण्याएेवजी केवळ विक्रेत्यांपर्यंत जात अाहे.

इथिकल व जेनरिक अशा दाेन प्रकारची अाैषधे डाॅक्टरांकडून लिहिली जातात. इथिकल अाैषधांची विक्री मेडिकल रिप्रेंझेटेटिव्हमार्फत हाेत असते. त्यांच्या किमतीही जास्त असतात. तुलनेत जेनरिक अाैषधी स्वस्त असतात. काही डाॅक्टरांनी जेनरिक अाैषधी लिहून दिल्या तरी विक्रेत्यांकडे त्या ब्रँडच्याच नावाने मिळतात. कंपन्यांवर किमतीचे बंधन नसल्यामुळे काही अाैषधांमध्ये अाठ ते दहापट फायदा विक्रेत्यांना हाेताे. हाेलसेलमध्ये दाेन रुपयांना मिळणाऱ्या अाैषधावर २० रुपये एमअारपी असते. जेनरिक अाैषधी अडीच- तीन रुपयांएेवजी १२ ते १५ रुपयांना विकली जातात. केंद्र शासनाने ‘मेडिकल काैन्सिल रेग्युलेशन २००२ मध्ये सुधारणा केली. यात डाॅक्टरांनी अाैषधी जेनरिक नावानेच लिहिण्याची सक्ती असल्याचे केंद्रीय अाराेग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले. परंतु अनेक डाॅक्टरांकडून त्याचे पालन हाेत नाहीत.

अायएमएची अाचारसंहिता : केंद्र शासनाने जेनरिक अाैषधासंदर्भात बदललेल्या तरतुदीनंतर इंडियन मेडिकल काैन्सीलने त्याचा समावेश डाॅक्टरांच्या अाचारसंहितेत केला अाहे. प्रत्येक डाॅक्टराने शक्यताे जेनरिक अाैषधीच लिहाव्या, असे त्यात म्हटले अाहे. एखाद्याने तसे न केल्यास त्यांना खुलासा करावा लागेल. तसेच डाॅक्टराने स्वत: किंवा नातेवाइकांमार्फत अाैषधांचा पुरवठा करू नये.

अायएमएची अाचारसंहिता
केंद्र शासनाने जेनरिक अाैषधासंदर्भात बदललेल्या तरतुदीनंतर इंडियन मेडिकल काैन्सीलने त्याचा समावेश डाॅक्टरांच्या अाचारसंहितेत केला अाहे. प्रत्येक डाॅक्टराने शक्यताे जेनरिक अाैषधीच लिहाव्या, असे त्यात म्हटले अाहे. तसेच काेणत्याही डाॅक्टराने स्वत: िकंवा नातेवाइकांमार्फत अाैषधांचा पुरवठा करू नये.

रसायनाचे नाव हवे
जेनरिक अाैषधी लिहिताना त्या कंपनीच्या नावाने नव्हे तर त्यातील घटक (रसायनाचे) नावाने लिहिले गेले पाहिजे. कारण जेनरिक अाैषधी स्वस्त असल्या तरी त्यावर एमअारपीचे बंधन नाही. त्यामुळे एमअारपी अाणि हाेलसेलमध्ये मिळणारी अाैषधी यात बऱ्याच वेळा अाठ ते दहापटीचा फरक असताे. यामुळे जेनरिक अाैषधींवर एमअारपीचे बंधन हवे. तसेच ब्रँड नेमएेवजी घटकच लिहायला हवेत.

जेनरिक औषध म्हणजे काय?
औषधाचा मूळ (फार्माकोलॉजी नेम) फॉर्म्युला म्हणजेच जेनरिक मेडिसीन होय. एकाच आजारावर विविध कंपन्यांची वेगवेगळ्या किमतीची औषधी मेडिकल स्टोअरवर उपलब्ध असतात. डॉक्टरांनी जेनरिक मेडिसिन लिहून दिल्यास रुग्ण त्याच्या बजेटनुसार औषधी खरेदी करू शकतो.

डाॅ. हर्षदीप कांबळेंना थेट प्रश्न
जेनरिक, ब्रँड अाैषधांमध्ये नावात फरक का नाही?

कांबळे : जेनरिक अाणि अाैषधी कंपनीच्या ब्रँडमध्ये फरक केल्यास एकाच घटकाच्या (रसायनाच्या) अनेक अाैषधी येतील. त्यामुळे ग्राहकांना जेनरिक अाैषध अाणि ब्रँडेड अाैषधांचा फरक समजेल, अशी काही तरतूद सध्या तरी कायद्यात नाही. केंद्र सरकार स्वत: सर्व जेनरिक अाैषधांची विक्री करण्याचा विचार करीत अाहे.

जेनरिक, ब्रँडेड अाैषधांच्या एमअारपीत जास्त फरक नसताे?
कांबळे : कंपन्या त्यांच्या जेनरिक अाैषधांच्या एमअारपी त्यांच्या ब्रँडच्या अाैषधांच्या जवळपास ठेवतात. जर जेनरिकची एमअारपी कमी ठेवली तर ब्रँडेड अाैषधांची विक्री हाेणार नाही. पर्यायाने कंपन्यांचा नफा कमी हाेईल. परंतु नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी(एनपीपीए)च्या यादीत अाैषध अाल्यास किमतीचे बंधन येईल.
बातम्या आणखी आहेत...