आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get Alternative For Expensive Medicine On One Click

एका क्लिकवर मिळवा महागड्या औषधांना पर्याय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महागड्या ब्रॅँडेड औषधांना पर्याय म्हणून उपलब्ध असलेल्या जेनेरिक औषधांची माहिती आता केवळ संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध झाली आहेत. जेनरिकच नव्हे तर पर्यायी ब्रॅँडेड औषधे त्यांच्या किमती याबाबतचीही माहिती या संकेतस्थळावर आहे. दिल्लीच्या विनोदकुमार मेमोरियल ट्रस्टने हा प्रकल्प सुरू केला असून, त्याकरिता एक संकेतस्थळ विकसित केले आहे. या प्रकल्पाकरिता ग्राहक हक्क संरक्षण मंत्रालयाचेही सहकार्य लाभले आहे.

महागडे वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावेत याकरिता जेनेरिक औषधांचा पर्याय समोर आला आहे. केंद्र शासनानेही 340 औषधे किंमत नियंत्रणात (डीपीसीओ) आणल्या आहेत. स्वस्त उपचारांचा भाग म्हणून अन्न व औषध प्रशासनानेही डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर ‘जेनेरिक स्वस्त औषधे द्यावीत’ असा शेरा मारावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनला केले आहे. तरी शहरात या बदलाचे आशादायी चित्र दिसत नाही. अशा काळात हे संकेतस्थळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.


उत्तम संकेतस्थळ
उपक्रम कौतुकास्पद आहे. डॉक्टरांनी रुग्णांना औषधाच्या यादीवर जेनरिक औषधाना प्राधान्य दिल्यास जनतेपर्यंत माहिती पोहचेल. त्याचा उपयोग रुग्ण वेबसाईडच्या माध्यमातून घेतील. सुनील भंगाळे, अध्यक्ष, मेडिकल असोसिएशन संकेतस्थळाचा फायदा सर्वसामान्यांनाही मिळेल. भारतातील कंपन्यांना यांचा फायदा होईल. तसेच आपल्याला हव्या असलेल्या औषधाची मागणी करता येईल. डॉ. नरेंद्र जैन, फिजिशियन


अशा पद्धतीने करता येईल संकेतस्थळाचा वापर
www.medguideindia.com या संकेतस्थळावर गेल्यानंतर होमपेज स्क्रिनवर येते. त्यावरील डाव्या बाजूला असलेल्या चौकटीत औषधाचे ब्रॅँडनाव टाकून सबमिट केले की तुम्हाला पुढील विंडोवर सविस्तर माहिती मिळते. येथे तुम्हाला ingredients/ match brandsही लिंक मिळते, त्यावर क्लिक केल्यानंतर पुढील पानावर औषधांची यादी मिळते, येथे matche brandsX ही लिंक मिळते ज्यातून तुम्हाला तुम्ही सबमिट केलेल्या औषधाशी जुळणार्‍या पर्यायी औषधांची यादी समोर येते. मोबाइलवर संकेतस्थळ वापरण्याकरिता www.medguidemobile.com असे टाइप करावे लागते. या संकेतस्थळाचा वापर पूर्णत: मोफत आहे. एवढय़ा सुलभ पद्धतीबद्दल रुग्ण, डॉक्टर, केमिस्ट धन्यवाद देत आहेत.