आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनेटद्वारे नोकरी मिळवणे झाले सोईस्कर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - नोकरीसाठी अर्ज करताना दगदग, धावपळ आलीच.! परंतु ही दगदग, धावपळ तुम्ही थांबवू शकता केवळ एका क्लिकवर. इंटरनेटच्या माध्यमातून नोकरीच्या संधी असून केवळ ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत शिकणे आवश्यक आहे. सर्व पात्रता अंगी असेल तर एकाच वेळी शेकडो कंपन्यांना ऑनलाइन अर्ज करून, रीतसर मुलाखतीद्वारे नोकरी मिळवू शकतो.
नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आज शेकडो साइट्स उपलब्ध आहेत. केवळ जिल्ह्यात, राज्यात नव्हे तर परराज्यात अगदी परदेशातही नोकरीच्या संधी आहेत. नोकरी, मॉनस्टर डॉट कॉम, टाइम्स जॉब, करिअर जेट, नोकरी हब, करिअर जॉब, बेस्ट जॉब इन इंडिया, क्लिक जॉब, अपना सर्कल, प्लेसमेंट इंडिया या व अशा सेकडो जॉबसाइट इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार, कुवतीनुसार शेकडो जॉब या साइट्स सुचवितात. त्याद्वारे मोठय़ा प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
केवळ रीतसर अर्ज व आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित प्लेसमेंट कंपनी, वेबसाइटकडून उमेदवाराला फोन केला जातो. नोकरी मिळवण्यासाठी या साइट्स खूपच उपयोगी ठरत आहेत. मोठमोठय़ा कॉर्पोरेट कंपन्या, शासकीय विभागही आता उमेदवार भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यावर भर देत असल्यामुळे पदवी किंवा अन्य व्यावसायिक शिक्षण घेणार्‍यांना ऑनलाइन अर्जाची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी संगणक साक्षरता आवश्यक आहे. विविध बहुराष्ट्रीय कंपन्या आता ऑनलाइन अर्ज स्वीकृतीला महत्त्व देताना दिसत आहेत. कारण ऑनलाइनमुळे फाइलिंगचा खर्च वाचतो. शिवाय कागदपत्रांचा गोंधळ उडण्याची शक्यताही कमी असते. काही कंपन्यांकडून विशेष सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांची माहिती साठविली जाते. प्लेसमेंट कंपन्यांकडे ऑनलाइन आलेले अर्ज संबंधित कंपन्यांना ई-मेलद्वारे फॉरवर्ड केले जातात. त्यामुळे पत्रव्यवहारही सोपा होत आहे. दरम्यान ऑनलाइन अर्जामुळे विद्यार्थ्यांचा त्रासही वाचतो. शिवाय वेळ आणि पैशांची बचत होते. नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क असल्यास ते शुल्कही ऑनलाइन बॅँकिंगच्या माध्यमातून स्वीकारले जाते.
तंत्रज्ञानाची कास धरा - सध्या सर्वच गोष्टी वेगाने बदलत आहेत. कॉम्प्युटरचे युग असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने संगणक साक्षर होणे आवश्यक आहे. भविष्यात मोबाइल इंटरनेटही वाढणार आहे. याचा विचार करून त्यादृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्याने सक्षम असले पाहिजे. नोकर्‍याही भविष्यात ऑनलाइन मिळवाव्या लागतील.