आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रद्दी द्या, इको फ्रेंडली वह्या घ्या', जळगावातील प्रकाशकाचा स्तुत्य उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पर्यावरण रक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने जळगावातील आनंद पब्लिकेशनतर्फे नावीन्यपूर्ण अशा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यात रद्दी विद्यार्थ्यांनी देऊन त्यांना पर्यावरणपूरक वह्या मिळणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षासाठी या योजनेची सुरुवात पब्लिकेशनतर्फे करण्यात येत आहे.

रद्दीच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना वह्या मिळणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी महाराष्ट्रात नव्हे तर देशात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येत आहे. २५ एप्रिल नंतर जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवला जाणार आहे. वह्या, पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्रे यांची रद्दी घेऊन विद्यार्थ्यांना नवीन वह्या देण्यात येणार असल्याचे पब्लिकेशनचे जितेंद्र कोठारी यांनी सांगितले.

उपक्रमांतर्गत १५ किलो रद्दीच्या बदल्यात मुलांना लहान १० वह्या किंवा मोठ्या ७ वह्या मिळतील. यासाठी १५ किलो रद्दी आणणे अपेक्षित असून ५ किलोच्या पटीत कितीही रद्दी मुले आणू शकतात. वह्या, पुस्तके, मासिके तसेच अन्य पेपरची रद्दी ही वेगवेगळी द्यावी लागणार आहे. जळगावात या वह्यांची निर्मिती केली जात आहे. यात दुरेघी, चाररेघी, चौकटी प्रकारातील वह्यादेखील बनवून दिल्या जाणार आहेत.
पुण्यात सुरुवात
पुणे मनपा यांच्यातर्फे पुण्यातील सर्व शाळांना याबद्दलचे परिपत्रक काढण्यात आले. त्या अंतर्गत १३ व १५ एप्रिलदरम्यान ६५०० किलोंची रद्दी जमा झाली ३०० शाळांतील १ लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
समाजसेवेचा उद्देश
^सामाजिक उद्देशाने हा उपक्रम मी सुरू केला. नेहमी काहीतरी वेगळे करण्याची धडपड असते. यात सामाजिक संस्था आणि शाळांनी साथ दिली, सहभाग नोंदवला तर नोटबुकसाठी विद्यार्थ्यांना खर्चच करावा लागणार नाही असे, जितेंद्र कोठारी म्हणाले.