आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरकुल घोटाळा : आज सहा आरोपींच्या जामिनावर युक्तिवाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल घोटाळ्यात अटकेत असलेल्या सहा आजी- माजी नगरसेवकांच्या जामिनासंदर्भात पोलिसांतर्फे सोमवारी खुलासा सादर करण्यात आला. मंगळवारी न्यायाधीश व्ही.एस.दीक्षित यांच्या युक्तिवाद होणार आहे.
घरकुल घोटाळ्यात जिल्हा कारागृहात असलेले नगरसेवक प्रा.चंद्रकांत सोनवणे, अजय जाधव, चत्रभुज सोमा सोनवणे, इक्बाल पिरजादे, वासुदेव सोनवणे, भगत बालाणी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तपासाधिकारी इशू सिंधू यांच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक नितीन नेहुल यांनी लेखी खुलासा सादर केला. आरोपींतर्फे अ‍ॅड.अकिल इस्माईल व अ‍ॅड.अनिकेत निकम काम पाहत आहेत.
मयूर यांच्या अर्जावर खुलासा मागवला
खान्देश बिल्डर्सचे संचालक राजा मयूर यांनी मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचण्यांसाठी परवानगीचा अर्ज दाखल केला होता. त्यावर 6 जून रोजी तपासाधिका-यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायाधीश दीक्षित यांनी दिले आहेत.