आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलप्रकरणी नगरसेवक घेताहेत कायदेतज्ज्ञांचा सल्ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल योजनेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याची तपासचके्र वेगात फिरू लागल्यानंतर घाबरलेल्या नगरसेवकांनी याबाबत आता शहरातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञांचे मत जाणून घेण्यास व सल्ला घेण्यास सुरुवात केली आहे.
नगरपालिकेच्या घरकुल प्रकरणात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलिस अधीक्षक इशू संधू यांनी सुरू केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाने चांगलाच वेग घेतल्यामुळे गुन्हा दाखल असलेल्या आजी-माजी 90 नगरसेवकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे घाबरलेले हे नगरसेवक आता बचावासाठी शहरातील वेगवेगळ्या कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात गुंतलेले दिसत आहेत तर काहींनी शहरात फिरणेच बंद केले आहे.
कागदपत्रांची जमवाजमव - पोलिस अधिकारी या गुन्ह्याच्या तपासासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे जमविण्यात व्यस्त असतानाच, आजी-माजी नगरसेवकदेखील काही कागदपत्रे आपल्याकडे असावीत म्हणून ती जमविताना दिसत आहेत. तसेच पोलिसांनी जी कागदपत्रे जमा केली, तीच कागदपत्रे माहितीचा अधिकार कायदा वापरून नगरसेवकांकडून मागविली जात आहेत.
अधिकारीही चौकशीच्या फे-यात - घरकुल प्रकरणात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात 90 आजी-माजी नगरसेवक व पदाधिका-यांना आरोपी करण्यात आले असले तरी, या प्रकरणाशी संबंधित तत्कालीन नगरपालिकेच्या काही अधिका-यांचाही चौकशीच्या फे-यात समावेश असणार आहे.