आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षणात महालेखापालांनी काढल्या त्रुटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यभर गाजलेल्या जळगाव महापालिकेतील घरकुल प्रकरणाने पुन्हा डोके वर काढले आहे. ११ वर्षांपूर्वी झालेल्या घरकुल योजनेच्या विशेष लेखापरीक्षणात राज्याच्या मुख्य लेखापालांनी त्रुटी काढल्या आहेत. डॉ. प्रवीण गेडाम यांनी दाखल केलेल्या फिर्यादीचा तपशील मागवणारे अर्ध शासकीय पत्र थेट आयुक्त संजय कापडणीस यांच्या नावाने पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्र लेखापरीक्षण लेखापाल कार्यालयाचे कर्मचारी शुक्रवारी दुपारी वाजता पालिकेच्या आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यांनी दोन पानी पत्र आयुक्तांच्या नावे दिले आहे. महापालिकेने घरकुलासह काही योजनांसाठी हुडकोकडून कर्ज घेतले होते. घेतलेले कर्ज घरकुल योजना यासंदर्भात शासनाकडून विशेष लेखापरीक्षण करून घेण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घरकुल घोटाळ्यासंदर्भात फिर्याद दिली होती. सध्या घरकुलाप्रकरणी न्यायालयीन खटला धुळे न्यायालयात सुरू आहे. शुक्रवारी धुळे न्यायालयात घरकुलाची सुनावणी सुरू असताना याच योजनेसंदर्भात प्रश्न निर्माण करणारे महाराष्ट्राच्या महालेखापालांचे पत्र महापालिकेत दाखल झाले.

मनपा प्रशासनाने पाळली गुप्तता
राज्याच्यालेखापरीक्षण कार्यालयाकडून आलेल्या या पत्रासंदर्भात प्रशासनाने गुप्तता पाळली आहे. थेट आयुक्तांच्या नावे असलेल्या पत्रामुळे ते उघड होऊ नये. यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे या पत्रात आणखी काही गंभीर बाबींचा उल्लेख आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

त्रुटींचे निरसन करून अहवाल द्यावा लागणार
घरकुलयोजनेसंदर्भात तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी शासकीय लेखापरीक्षण करून घेतले होते. त्यातील आक्षेपांच्या आधारे फिर्याद तयार करून गुन्हा नोंदवला होता. लेखापरीक्षण होऊन आज १० वर्ष उलटली आहेत. मात्र, इतक्या वर्षांनंतर राज्याच्या महालेखापाल कार्यालयाने या लेखापरीक्षणात त्रुटी काढल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. विशेषत: घरकुल योजनेसंदर्भात असलेल्या त्रुटींबाबत निरसन करून तसा अहवाल महापालिकेला पाठवावा लागणार आहे.

अधिकाऱ्यांचीही माहिती मागवली
महालेखापालकार्यालयाने पाठवलेल्या पत्रात घरकुल योजनेसंदर्भात माहिती विचारली आहे. पालिकेने बांधलेल्या घरकुलांची सद्य:स्थिती काय आहे. घरकुलधारकांकडून होणाऱ्या वसुलीचे काय? घरकुल मोफत देण्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्व आहेत का?, मोफत घरकुल दिले असतील तर कशाच्या आधारे दिलीत. या योजनेशी संबंधित जबाबदार अधिकारी पदाधिकाऱ्यांची माहितीसह ११ मुद्यांचा या पत्रात समावेश आहे.