आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घरकुल’ वसुलीबाबत उद्या खंडपीठात निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल योजनेत महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका विशेष लेखापरीक्षणात ठेवण्यात आला होता. त्यानुसार झालेल्या नुकसानाची जबाबदारी नगरसेवकांवर टाकण्यात आली आहे. प्रत्येकी सव्वा कोटी वसुलीच्या नोटीससंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने कारवाईला स्थगिती दिली आहे. गोलाणीचे भुत डोक्यावर असताना आता वसुलीसंदर्भात सोमवारी कामकाज होणार असून स्थगितीवर काय निर्णय होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तत्कालीन जळगाव नगरपालिकेने मोफत बस प्रवास योजना, पेव्हर रस्ते डांबरीकरण योजना, वाघूर पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, विमानतळ योजना या पालिकेची आर्थिक परिस्थिती नसताना हाती घेतलेल्या होत्या. योजनेतील गैरप्रकारांमुळे आता महापालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या पाचही योजनांचे एप्रिल १९९६ ते ३१ मार्च २००६ या दरम्यानचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. त्यानुसार फेब्रुवारी २००७ रोजी मुख्य लेखापरीक्षकांनी निष्कर्षासह स्वतंत्र विशेष अहवाल सादर केले होते.

सव्वाकोटींची जबाबदारी
बेकायदेशीरघरकुल योजनेसाठी ५९ कोटी रुपये हुडकोकडून कर्ज घेऊन खर्च करण्यात आला होता. या नियमबाह्य खर्च झालेल्या रकमेची सामूहिक जबाबदारी कोटी १६ लाख इतकी वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यासाठी आजी- माजी ४८ नगरसेवकांना १२ ऑगस्ट २०१३ रोजी वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. यात नगरसेवकांकडून रक्कम वसूल करण्यास औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. तर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी डिसेंबर २०१४ रोजी खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यावर आता १३ जुलै राेजी काम होणार आहे. यात स्थगिती कायम राहते की, उठवण्यात येते? याकडे लक्ष लागून आहे.

अनेकांनी मागवली ठरावांची माहिती
गोलाणीच्याउभारणीसाठी तत्कालीन नगरपालिकेने केलेल्या वेगवेगळ्या १३ बेकायदेशीर ठरावांच्या मंजुरीप्रसंगी कोणते नगरसेवक उपस्थित होते, याची आज ब-याच जणांना आठवणही नाही. त्यामुळे अनेकांनी महापालिकेत माहितीच्या अधिकारात अर्ज करून तत्कालीन ठरावांची नगरसेवकांच्या यादीची मागणी केली आहे.

गोलाणीतही यांचाच संबंध
घरकुलयोजनेची सुरुवातही १९९५ पासून झाली असून त्यापूर्वी गोलाणीचे बांधकाम सुरू झाले होते. परंपरागत नविडून येणा-या ब-याच कुटुंबाचा या योजनांच्या मंजुरी काळात संबंध आला आहे. त्यामुळे घरकुल योजनेत ठपका असलेल्या बहुसंख्य नगरसेवकांचा गोलाणीच्या फिर्यादीत समावेश होण्याची दाट शक्यता आहे.