आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरेश जैन यांना कारागृहात हलवण्याबाबत आज निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन यांना कारागृहाच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी विशेष सरकारी वकील अँड.प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर न्यायाधीश व्ही.एस.दीक्षित यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

विशेष सरकारी वकील अँड.प्रवीण चव्हाण यांनी दिलेल्या अर्जावर आमदार जैन यांचे वकील अँड.अकिल इस्माईल हे आपले म्हणणे सादर करतील. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांचा त्यावर युक्तिवाद घेण्यात येणार आहे. युक्तिवादानंतर न्यायाधीश दीक्षित त्या अर्जावर आपला निर्णय सुनावतील.

मंगळवारी न्यायाधीश दीक्षित यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी सुरू असताना आमदार सुरेश जैन यांचे वकील अँड.अकिल इस्माईल व विशेष सरकारी वकील अँड.चव्हाण यांच्यात युक्तिवादादरम्यान जोरदार वादावादी झाली होती. त्यामुळे गुरुवारी या अर्जावरील सुनावणीत न्यायालयात काय निकाल देते? याबाबत अनेकांचे लक्ष लागून राहीले आहे.
रायसोनींच्या जामीन अर्जावर आज निर्णय - प्रदीप रायसोनी यांचा जामीन अर्ज दोन वेळा जिल्हा न्यायालयात फेटाळून लावल्यानंतर त्यांनी औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश अंबादास जोशी यांचेसमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान न्यायालयात दोन्ही बाजूंकडील वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश जोशी सोमवारी त्यावर निर्णय देणार होते. मात्र, या अर्जावर सोमवारी निर्णय न होऊ शकल्याने त्यावर गुरुवारी न्यायाधीश जोशी निर्णय देणार आहेत.
सुरेश जैन यांना कारागृहाच्या ताब्यात देण्यासाठी अर्ज
आणखी एका प्रकरणात सुरेश जैन मुख्य आरोपी