आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटकोपरला विजेतेपद, जळगाव संघ उपविजेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- घाटकोपर(मुंबई) संघ जळगाव इलेव्हन संघाचा ७५ धावांनी पराभव करून निखिल खडसे स्मृतिचषक स्पर्धेत विजेता ठरला. घाटकोपर संघाचा खालीद अन्सारी सामनावीर आणि मालिकावीरचा मानकरी ठरला. जळगाव इलेव्हनचा खेळाडू अबू साद उत्कृष्ट फलंदाज आणि शिवप्रसाद पुरोहित उत्कृष्ट गोलंदाज ठरला.

निखिल खडसे प्रतिष्ठान जळगाव शहर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे निखिल खडसे स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी घाटकोपर जळगाव इलेव्हन संघात अंतिम सामना होऊन विजेत्या उपविजेत्या संघाला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
एकतर्फी लढत
घाटकोपर आणि जळगाव इलेव्हन संघ यांच्यात अंतिम सामना झाला. यात पंतनगर घाटकोपर संघाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत सात गडी राखत १६४ धावा करून जळगाव संघास १६५ धावांचे लक्ष्य दिले. घाटकोपर संघातील खालीद अन्सारीने ७० चेंडूत ९३ धावा करीत सामनावीराचा किताब पटकावला. त्याने ११ चौकार आणि चार षटकार लगावले. तसेच प्रशांत मार्को याने १३ धावा, अभिषेक देसाई ३६ धावा, आदित्य शेवाडकर याने १६ धावा रचल्या.
गोलंदाजी करताना घाटकोपर संघातील अनिकेत शिंदे याने चार षटकांत २९ धावा देत तीन गडी बाद, खालीद अन्सारीने चार षटकांत १३ धावा देत दोन गडी बाद केल, तर नितीन पनाले याने १.१ षटकात दोन धावा देत दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात जळगाव इलेव्हन संघात संदीप बिलारे याने २५ धावा, शिवप्रसाद पुरोहित याने १२ धावा तर गोपाल मिद्या ने १२ धावा केल्या. अन्य खेळाडूंनी समाधानकारक धावा केल्या नाहीत. सर्व खेळाडू १६.१ षटकांत बाद होऊन केवळ ८९ धावांपर्यंतच मजल मारू शकले.
पारितोषिक वितरण
विजेत्या घाटकोपर संघाला एक लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश चषक, उपविजेत्या जळगाव इलेव्हन संघाला ६६ हजार ६६६ रुपयांचा धनादेश चषक देऊन गौरवण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते विवेक ओबेरॉय, अभिनेते सीआयडी फेम दया उर्फ दयानंद शेट्टी तसेच महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, डॉ.सुभाष भामरे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहंमद हुसेन, जि.प.सीईआे आस्तिककुमार पांडेय, खासदार ए.टी.पाटील, पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे आदी उपस्थित होते. क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजू खेडकर यांनी प्रास्ताविक केले.
पंच म्हणून अजय जोशी, नृपेंद्र सिंग यांनी काम पाहिले. समालोचन गणेश पाटील, सुभाष पवार, मनोज शर्मा यांनी केले. मोहंमद फजल यांनी गुणलेखकाचे काम पाहिले. यशस्वितेसाठी हसीन तडवी, किरण चौधरी, राहुल सुरवाडे, राहुल चौधरी, प्रवीण इंगोले, नितीन पाटील, अक्षय राणेसह असोसिएशनच्या खेळाडूंनी सहकार्य केले.

प्रेक्षकांनी मैदान फुल्ल
प्रथमच क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा संकुल तुडुंब भरले होते. दोन्ही सिने अभिनेत्यांना पाहण्यासाठी जळगावकरांनी चांगलीच गर्दी केली होती. विवेक ओबेरॉय हे प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी उभे राहिले असता, प्रेक्षकांमधून जल्लाेष करण्यात आला.
दरवाजा तोडून दयाचा प्रवेश
बक्षीसवितरण कार्यक्रमाला अभिनेता विवेक ओबेरॉय व्यासपीठावर आल्यानंतर काही वेळातच मैदानात प्लायवूडचा बनवलेला दरवाज सीआयडी स्टाइल तोडून दयाने रात्री ८.३० वाजता प्रवेश केल्याने प्रेक्षकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
बातम्या आणखी आहेत...