आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; नऊ गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍मक छायाचित्र
मुक्‍ताईनगर (जळगाव) – घोडसगाव येथे आज (मंगळवार) पहाटे 3 वाजताच्‍या सुमारास तवेरा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात तीन जण जागीच ठार झाले तर नऊ गंभीर जखमी झालेत. मृत्‍यूमुखी पडलेले सर्व एकाच कुटुंबातील असून, ते माहूर येथे देव दर्शनासाठी जात होते. ही घटना मुक्‍ताई सहकारी साखर कारखान्‍याजवळ घडली.
शिरसोली येथील ताडे कुटुंब रात्री देव दर्शनासाठी माहूरकडे जात होते. दरम्‍यान, त्‍यांच्‍या तवेरा गाडीची ट्रकसोबत भीषण धडक झाली. यात तिघे जण जागीच ठार झालेत तर नऊ जण गंभीर जखमी झाले. जखमीमध्‍ये सीमा दिलीप ताडे, सारिका दिलीप ताडे, रुपेश सुरेश बारी, सुलोचना दिलीप ताडे, ज्‍योती सुरेश जाडे, सागर दिलीप ताडे सुरेश विठ्ठल ताडे, दिलीप विठ्ठल ताडे यांचा समावेश असून, त्‍यांच्‍यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.