आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘यात्री’ से सावधान, गुटखा, पानमसाला विक्रीला बंदी असूनही खुलेआम विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यात गुटखा, पानमसाला विक्रीला बंदी असतानाही बाजारात सध्या ‘यात्री’ नावाच्या गुटख्याची सर्रास विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे या गुटख्याच्या पाऊचवर ‘यात्री’ नावा व्यतिरिक्त त्यात कोणता पदार्थ आहे, ते कोठून उत्पादित केले आहे, याचा साधा उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे या गुटखा निर्मात्याने नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू केला आहे.
आरोग्याला हानी पोहचत असल्याने शासनाने ऑगस्ट २०१२ पासून गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूवर बंदी घातली आहे. काही दिवस विक्री बंद होती. मात्र, निर्मात्यांनी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत बाजारात गुटखा विक्री पुन्हा सुरू केली आहे.
‘यात्री’ या गुटख्याची निर्मिती जळगावातच होत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र, उत्पादन कंपनीच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. तसेच ‘यात्री’ गुटख्याची विक्री व्हावी, यासाठी इतर गुटख्यांच्या ब्लॅक मार्केटिंगवरही बंदी घातली जाऊन यात्री गुटखा विक्री करा, असे बंधनकारक केले जात असल्याचे एका विक्रेत्याने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले.
कायद्यातील पळवाटा
राज्यात अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुटखा विक्रीला पूर्णपणे बंदी आहे. मात्र, यासाठी गुटखा निर्मात्यांनी नवीन शक्कल लढवली आहे. यात तंबाखू आणि पान मसाल्याच्या पुड्यांची वेगवेगळी विक्री केली जाते. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून गुटखा शौकीन त्या खातात. त्यात भर म्हणून उत्पादन कोणते आहे, त्याचाही उल्लेख करता ‘यात्री’ नावाच्या गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. पाऊचवर गुटखा किंवा पान मसाला लिहिलेले नसल्याने कायद्याने त्यांच्यावर तक्रार दिल्याशिवाय कारवाईसुद्धा होऊ शकत नाही. याकडे अन्न औषधी प्रशासन विभागानेही कानाडोळा केला आहे.
पाऊचवर उल्लेख आवश्यक
कोणत्याही प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या पाऊचवर काही गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक असते. यात सर्वांत अगोदर कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे. त्यात कोणते घटक आहेत. खाद्य पदार्थ शाकाहारी असेल तर हिरवा आणि मांसाहारी असेल तर तपकिरी रंगाचे बोधचिन्ह हवे. त्या पदार्थांच्या उत्पादनाची तारीख आणि कधीपर्यंत खाण्यास योग्य (एक्सपायरी) आहे, याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असते. तसेच त्या पदार्थांचे वजन किती आहे? उत्पादकाचे नाव पत्ता, परवाना क्रमांक (लायसेन्स नंबर), बॅच नंबर आदी गोष्टींचा ही उल्लेख असणे आवश्यक असते.
गुटखा बाजारात उपलब्ध
सध्या बाजारात गुटख्याच्या नावाखाली शरीराला घातक असलेल्या पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे हे पदार्थ खाणाऱ्याला कर्करोगासारखे आजार होण्याची शक्यता असते. यात आता बनावट गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. त्यामुळे कर्करोगासह, किडनी, दातांचे आणि जबड्याच्या आजाराला निमंत्रण दिले जात आहे. सवयीमुळे नाइलाजाने अनेक नागरिक गुटख्याच्या आहारी गेले आहेत.
ही तर ग्राहकांची शुद्ध फसवणूक
- पाऊचमध्ये कोणता पदार्थ विक्री केला जातोय, त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. गुटखा विक्रीला कायद्याने बंदीच आहे. मात्र, कोणताही उल्लेख करता गुटखा विक्री होत असेल, तर ही ग्राहकांची शुद्ध फसवणूक आणि कायद्यातून शोधलेली पळवाट आहे.
अॅड. ललित बरडिया, अन्नसुरक्षा मानके कायद्याचे तज्ज्ञ
कारवाई करण्यात येईल
- अन्न औषधे सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखू विक्री करणे गुन्हा आहे. यासंदर्भात तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.
बी.यू. पाटील, सहा. आयुक्त, अन्न औषधे प्रशासन विभाग
आरोग्यास हानिकारक
- गुटखा, पान मसाला, तंबाखू हे पदार्थ मुळात आरोग्याला हानिकारक आहेत. त्यात बनावट गुटखा म्हणजे कर्करोगाला निमंत्रणच आहे. त्यामुळे नागरिकांनी गुटखा सेवनापासून दूर राहिलेलेच बरे.
डॉ. किरण पाटील, अतिरिक्ति जिल्हा शल्यचिकित्सक
बातम्या आणखी आहेत...