आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅगचोराची न्यायालयातही नौटंकी, चक्कर येऊन पडल्याचे नाटक केले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खोटारडा बॅगचचोर सुनील शेट्टी याने गुरुवारी न्यायालयात चांगलीच नौटंकी केली. सुनावणी सुरू असताना सुनीलने चक्कर येऊन पडल्याचे नाटक केले. एवढेच नव्हे तर तोंडातून फेस काढला. हे पाहून उपस्थित सारेच थक्क झाले. परंतु, शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना त्याचा नाटकीपणा माहीत असल्याने ते धावत त्याच्याकडे गेले, तेव्हा तोचटकन उठून उभा राहिला. त्यामुळे न्यायालयात त्याची नोटंकी उघड झाली.

भवानीपेठेत हुकूमचंद लढ्ढा (वय ५०) हे भवानी देवीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून २२ हजार ८०० रुपये लंपास केल्याची घटना ३१ जुलैला घडली होती. चोरी करताना सुनील रामा शेट्टी आणि गोपी लक्ष्मण शेट्टी हे दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. शहर पोलिसांनी फुटेजच्या आधारे दोघांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्याने त्यांना न्यायाधीश ए.डी.बोस यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सुनावणीदरम्यान सुनील शेट्टी याने न्यायाधीश बोस यांच्यासमोर चक्कर येऊन पडल्याचे नाटक केले. त्यानंतर हातोत, पाय झटकू लागला अन् तोडातून फेस काढू लागला. सुनीलला काय झाले? म्हणून पोलिस धावत त्याच्याकडे गेले. त्या वेळी तोनाटक करीत असल्याचे पोलिसांना दिसले. म्हणून त्यांनी त्याला आवाज देऊन उठण्याचे सांगितले. त्या वेळी तोचटकन उभा राहिल्याने त्याची नौटंकी उघड झाली. या दोघांनी दिलेल्या खोट्या पत्त्यामुळे पोलिसांना सोलापूरचे हेलपाटे मारावे लागले होते.

यापूर्वीही केले वेगवेगळे नाटक
शहरपोलिसांच्या ताब्यात असताना दोघा चोरट्यांनी नाकात नखाने ओरखडून रक्त काढणे, जीभ दाताखाली चावून जखमा करून रक्ताची उलटी होते असल्याचे सांगणे, आदी नाटके केली होती. सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा त्रासापासून वाचण्यासाठी अट्टल चोर असे हातखंडे वापरतात. त्यामुळे त्यांच्या नाटकाचा पोलिसांवर परिणाम झाला नव्हता.
कहर

दोघे शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात
न्यायालयानेदोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्या वेळी शनिपेठ पोलिसांनी न्यायालयात दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याकरिता अर्ज सादर केला.न्यायालयाने मान्य करत दोघांना शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे . सरकार पक्षातर्फे अनिल बागले यांनी तर आरोपीतर्फे अजय शिसोदिया यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...