आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणा नदीवरील पुलाची खड्ड्यांमुळे झाली चाळण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वाहतुकीच्यासुविधेसाठी पुलांची निर्मिती केली जाते. मात्र, हे पूलच वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे चित्र महामार्ग क्रमांक ६वर सध्या पाहायला मिळत अाहे. धुळ्याकडून येताना गिरणा नदीवरील पुलाची अक्षरश: चाळणी झाली अाहे. पिंप्राळा पुलाचीदेखील तीच अवस्था अाहे. गिरणा नदी पुलावर छाेटे-माेठे असे ३५, तर पिंप्राळा पुलावर ११ खड्डे पडले असून, या रस्त्याने कसे यावे-जावे? असा प्रश्न वाहनधारकांना पडला अाहे. खड्ड्यांमुळे अपघात हाेणे हा दरराेजचा विषय झाला अाहे. याशिवाय दरराेज ये-जा करणाऱ्यांना या खड्ड्यांनी हाडांच्या दुखण्याची अनाेखी भेट दिली अाहे. असे असतानाही महामार्ग विभागाने मात्र या रस्त्याच्या दुरवस्थेकडे डाेळेझाक केली असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात अाहे.

महामार्गावरील शिव काॅलनी ते बांभाेरीदरम्यान असलेल्या दाेन्ही पुलांवर सुमारे पाच ते सहा इंच खाेल खड्डे पडले अाहेत. या खड्ड्यांमधून अचानक वाहन गेल्यास वाहनधारकांचा ताेल जाताे. त्यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागते. खड्डे चुकवताना पडल्यामुळे अपघात हाेण्याचे प्रमाणदेखील वाढले अाहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. त्यामुळे रात्री हे खड्डे वाहनचालकांना दिसत नसल्यानेही या पुलावर अपघात हाेण्याचे प्रमाण सध्या वाढले अाहे. तसेच खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे गुडघ्यांचे दुखणे सुरू झाले अाहे.
पिंप्राळा रेल्वेपुलावरील खड्डा
गिरणा नदीच्या पुलावर पडलेले मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची झालेली दयनिय अवस्था. येथे तत्काळ दुरुस्तीची अपेक्षा व्यक्त होत आहे.