आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या विरोधकांची मोटबांधणी सुरू; महाजन-जैन यांची दीड तास बंदद्वार चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी शिवसेनेचे माजी अामदार सुरेश जैन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापाैर नितीन लढ्ढा हेही या वेळी उपस्थित हाेते.

सर्वांसमक्ष तासाभराची चर्चा केल्यानंतर पुन्हा महाजन यांनी सुरेश जैन त्यांचे पुत्र राजेश यांच्याशी सुमारे दीड तास बंद खाेलीत एकांतात चर्चा केली. महाजन-जैन यांच्या भेटीमुळे नव्या राजकीय समीकरणांचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली.

जळगाव घरकुल घाेटाळ्यात सुमारे साडेचार वर्षे तुरुंगात असलेले सुरेश जैन शनिवारीच जामिनावर बाहेर अालेले अाहेत. जैन हे जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते मानले जातात. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी सायंकाळी वाजता ‘सात, शिवाजीनगर’ हे सुरेश जैन यांचे निवासस्थान गाठले. या वेळी दाेघांनी अॅन्टी चेंबरमध्ये चर्चा केली. सुरुवातीला महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापाैर नितीन लढ्ढा, राजेश जैन यांनीही चर्चेत भाग घेतला. तासभराच्या या चर्चेनंतर राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापाैर लढ्ढांसह सर्व पदाधिकारी बाहेर अाले. नंतर महाजन यांनी जैन पिता-पुत्रासाेबत साडेपाच वाजेपर्यंत एकांतात चर्चा केली. या वेळी जैन यांना भेटण्यासाठी जिल्हाभरातील विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी बाहेर थांबून हाेते.

तुरुंगातून सुटून शनिवारी सायंकाळी सुरेश जैन जळगावात अाल्यानंतर रविवारी सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटण्यासाठी गर्दी केली हाेती. महापाैर नितीन लढ्ढा अाणि त्यांचे अष्टप्रधानमंडळ तेथेच थांबून हाेते. माजी खासदार अॅड. वसंतराव माेरे, अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, तिलाेत्तमा पाटील, माजी संचालक राजीव पाटील, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डाॅ. ए.जी.भंगाळेे, डाॅ. शांताराम साेनवणे यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुरेश जैन यांची भेट घेतली.

शनिवारी सायंकाळी निवडक कार्यकर्त्यांसाेबत संवाद साधत असताना सुरेश जैन यांना त्यांच्या भवितव्याबाबत विचारणा केली असता, ‘अाता अापले शेवटचे राजकीय स्टेशन शिवसेनाच असेल’ असे सूताेवाच त्यांनी केल्याचे सांगितले जात अाहे. त्यामुळे शिवसेना वाढीच्या दृष्टीने जैन प्रयत्नशील राहतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना अाहे.

अागामी राजकीय भूमिकेकडे लक्ष
जळगाव जिल्ह्यातील वजनदार भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे हे सुरेश जैन यांचे कट्टर राजकीय वैरी, तर गिरीश महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते असूनही खडसेंशी त्यांचे ‘विळ्या भाेपळ्या’चे सख्य अाहे. जैन समर्थक शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील खडसे यांच्यातूनही ‘विस्तव’ जात नाही. या पार्श्वभूमीवर महाजन जैन यांच्यातील बंदद्वार चर्चेमागील नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता अाहे. तसेच जैन यांनी अागामी राजकीय भूमिका काय असेल, यावरही चर्चा सुरू झाली आहे.

सदिच्छा भेट...
माजी अामदार सुरेश जैन हे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अाहेत. साडेचार वर्षांपासून ते कारागृहात हाेते. या काळात त्यांनी अनेक मानसिक संकटे पेलली. दीड वर्षापासून त्यांची भेट नव्हती. त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी अालाे हाेताे. स्वास्थ्य अाणि काैटुंबिक चर्चा केली. चर्चेत काेणताही राजकीय विषय नव्हता.
-गिरीश महाजन, जलसंपदामंत्री.
बातम्या आणखी आहेत...