Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Girish Mahajan going to Eknath Khadse

मंत्री महाजन ‘अापला’ उमेदवार घेऊन खडसेंच्या दारी!

प्रतिनिधी | Update - Nov 19, 2016, 07:30 AM IST

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची सर्वस्वी सूत्रे हाती असलेले राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी अापले समर्थक व भाजपचे उमेदवार चंदुलाल पटेल यांना विजयी करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली अाहे.

 • Girish Mahajan going to Eknath Khadse
  जळगाव - जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची सर्वस्वी सूत्रे हाती असलेले राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी अापले समर्थक व भाजपचे उमेदवार चंदुलाल पटेल यांना विजयी करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली अाहे. शुक्रवारी त्यांनी माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व पटेल यांना सहकार्य करण्यासाठी साकडे घातले.

  अामदार खडसे या निवडणुकीपासून पूर्णपणे अलिप्त असून शुक्रवारीच ते जळगावात दाखल झाले अाहेत. मतदानाच्या अादल्या दिवशी उमेदवार चंदुलाल पटेल यांना साेबत घेऊन मंत्री महाजनांनी अामदार खडसे यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. नाराज खडसे समर्थकांचा पवित्रा लक्षात घेता महाजन यांनी खडसेंची भेट घेतली असल्याचे सांगितले जाते. जळगाव जिल्ह्यातील भाजपचे दाेन दिग्गज नेते एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यातील विळ्या-भाेपळ्याचे ‘सख्य’ सर्वश्रुत अाहे. भूखंड गैरव्यवहार प्रकरणात खडसेंचे मंत्रिपद गेल्यानंतर महाजनांचे पक्षात व जिल्ह्यात वर्चस्व वाढले अाहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर अाले हाेते.

  अामदार खडसेंचे समर्थक व मावळते अामदार गुरुमुखदास जगवानी यांचा पत्ता कट करत महाजनांनी अापले समर्थक चंदुलाल बियाणी यांना उमेदवारी मिळवून दिली. तेव्हापासून खडसे- महाजन गटात संबंध अाधीपेक्षाही अधिक ताणले गेले हाेते. या वेळी निवडणुकीची सूत्रे खडसेंएेवजी महाजनांकडून हाताळली जात असल्याने खडसे काहीसे अलिप्त हाेेते. दरम्यानच्या काळात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार पटेल यांनी भुसावळ येेथे खडसे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला हाेता. तेव्हा ‘माेठे मंत्री तुमच्या पाठीशी असल्याने माझ्या अाशीर्वादाची काय गरज?’ असा चिमटा त्या वेळी खडसे यांनी काढला हाेता.
  दरम्यान, शनिवारी विधान परिषदेची निवडणूक हाेत अाहे. त्यापूर्वी गुरुवारी शहरातील एका माेठ्या हाॅटेलात भाजपतर्फे मतदारांसाठी डिनर डिप्लाेमसीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. मंत्री गिरीश महाजन यांनी मतदारांशी वैयक्तिक संवाद
  साधला हाेता.
  ‘मुक्ताई’वर बंदद्वार चर्चा
  विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारापासून पूर्णपणे अलिप्त असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे शुक्रवारी जळगावात दाखल झाले. या निवडणुकीत काेणताही दगाफटका हाेऊ नये म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली. साेबत भाजपचे उमेदवार चंदुलाल पटेल व खडसे समर्थक गुरुमुखदास जगवानी हेही हाेते. अामदार खडसेंची भेट घेण्यासाठी ‘मुक्ताई’ बंगल्यावर सकाळी ९.३० दरम्यान या तिघांमध्ये बराच वेळ बंदद्वार चर्चा झाली. त्यानंतर खडसे मतदारसंघात निघून गेेले. चर्चेतील तपशील बाहेर अाला नव्हता.

Trending