आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकनाथ खडसेंकडे अंतर्गत माहिती असू शकते : गिरीष महाजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘भाजपमध्ये काही लाेकं गद्दार असून कार्यकर्त्यांनी विराेधकांएेवजी या गद्दारांचे थाेबाड रंगवा’, असे विधान दाेन दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले हाेते. परंतु पक्षात काेणीही गद्दार नाहीत, नाथाभाऊंकडे काही वेगळी माहिती असेल तर त्याबाबत अापल्याला माहिती नाही. खडसेंवर हाेत असलेल्या अाराेप अाणि राजीनाम्यासंदर्भात खुद्द त्यांनीच स्पष्टीकरण दिले अाहे, मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली अाहे. त्यामुळे माझ्यासारखा छाेटा कार्यकर्ता खडसेंवर बाेलण्याइतका माेठा नाही. ते अाराेपातून तावून-सलाखून बाहेर येतील, अशी अाशा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केली.

खडसेंचा राजीनामा, भाजपमधील वाढती गटबाजी या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून माैन बाळगून असलेले महाजन पत्रकारांशी बाेलले. पक्षात काेणतीही गटबाजी नाही. एकनाथ खडसे सर्वांचे नेते अाहेत, त्यांच्यावरील अाराेपातून ते निर्दोष हाेतील. ते पुन्हा मंत्रिमंडळात केव्हा येणार, याबाबत मात्र वरिष्ठच सांगू शकतील असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. ‘खडसेंवरील अाराेपाबाबत तुमची भूमिका काय?’ या प्रश्नावर ‘त्यांच्यावर बाेलण्याइतका मी माेठा नाही, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अाणि खुद्द खडसे यांनी स्पष्टीकरण दिले अाहे,’ एवढे माेजकेच उत्तर महाजन यांनी दिले म्हणाले.

पालकमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी
पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणारा मी सामान्य कार्यकर्ता अाहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर काय बदल हाेतात, हे माहीत नाही. परंतु, मंत्र्यांची संख्या वाढणार असल्याने मंत्र्यांकडे अातासारखे दाेन जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राहणार नाही. नाशिकमधून काेणी मंत्री झाले, तर तेथील पालकमंत्रिपद जाईल. पक्षाने अादेश दिले तर मला जळगावचे पालकमंत्रिपद स्वीकारावेच लागेल, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

दमानियांना कागदपत्रे दिलीच नाहीत
अंजली दमानिया यांना खडसेंविराेधातील कागदपत्रे देण्यासाठी तापी पाटबंधारे महामंडळाचे कार्यालय रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्यात अाले हाेते. यासंदर्भात महाजन म्हणाले, ‘दमानियांना काेणतेही कागदपत्रे देण्यात अालेली नसल्याचा दावा केला. त्या माहिती घेण्यासाठी अाल्या हाेत्या. परंतु, त्यांना केवळ पाहिजे असलेली माहिती दिली. त्यांना हवी असलेल्या माहितीसाठी अर्ज करावा लागेल.’
युतीसाठी प्रयत्न
मंत्रिमंडळात भाजप-शिवसेना युती अाहे. स्थानिक पातळीवर हाेणाऱ्या निवडणुकीत वरच्या पातळीवर निर्णय हाेत नाहीत. स्थानिक पातळीवर सर्वांना अधिकार अाहेत. जर दाेन्ही पक्ष सत्तेत एकत्र अाहेत, तर जिल्हा परिषदेमध्येदेखील युती करावी असा प्रयत्न असेल, असे महाजन म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...