आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू; डाॅक्टरांवर हलगर्जीपणाचा अाराेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पोटदुखीच्या त्रासामुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या १८ वर्षीय युवतीचा गुरुवारी दुपारी 2 वाजता मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांनी उपचार न करता लक्ष्मीपूजनासाठी वेळ घालवला. या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला अाहे. तर युवतीच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यासही कुटुंबीयांनी नकार दिल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. 
 
जामनेर तालुक्यातील भराडी येथील दीपाली नाना पाटील (वय १८) असे मृत युवतीचे नाव आहे. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहिती नुसार दीपाली हिला बुधवारी रात्री पोटदुखीचा प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे गुरुवारी पहाटे वाजता कुटुंबीयांनी तिला रिंगरोड परिसरातील नित्ससेवा नर्सिंगहोम या डॉ. सी. जी. चौधरी यांच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सकाळी वाजेपर्यंत तिच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार करण्यात आले नाहीत. काहीवेळानंतर रक्त, लघवी तपासणीसाठी तिला बाहेर पाठवण्यात आले. तर दुपारी १२ वाजेनंतर डॉक्टर पूजेसाठी घरी निघून गेले. त्यानंतर दुर्दैवाने दीपालीला पोटदुखीचा त्रास असह्य होऊ लागला होता. कुटुंबीयांनी नर्सेसकडे वारंवार विनंती करून डॉक्टरांना बोलावण्याबाबत सांगितले. मात्र, डॉक्टर पूजेत असल्यामुळे ते खाली आले नाहीत. अशातच दुपारी वाजता दीपालीचा मृत्यू झाला. यानंतर मात्र, कुटुंबीयांना रुग्णालयात चांगलाच संताप व्यक्त केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 
चालत गेलेल्या मुलीचा मृत्यू झालाच कसा? : सकाळी रक्त, लघवी तपासणी सोनोग्राफीसाठी दीपाली स्वत: चालत पॅथॉलॉजीमध्ये गेली होती. तिचे रक्त, लघवी सोनोग्राफी तपासणीचे अहवाल नॉर्मल आले होते. तरीदेखील तिच्या अचानक झालेला मृत्यूमुळे नातेवाईक, कुटुंबीयांना संशय आला. अन् डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांनी केला. दुपारी हा वाद सुरू होताच डॉ. चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात माहिती देऊन पोलिसांना पाचारण केले. त्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले होते. पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण नियंत्रणात आणले. 
 
शवविच्छेदन करण्यावरून तणाव 
दीपालीचामृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांनी दोन तास रुग्णालयात संतापदेखील व्यक्त केला. पोलिस आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांची समजूत काढली. त्यानंतर कुटुंबीय शांत झाले. परंतु, दीपालीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही, असा पावित्रा त्यांनी घेतला होता. मृतदेह तसाच घरी घेऊन जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु, कायद्यानुसार असे करता येत नाही. तिच्या मृत्यूचे खरे कारण काय आहे? याचा शोध घेण्यासाठी शवविच्छेदन करावेच लागेल, असे सांगळे, गायकवाड यांच्यासह घटनास्थळी दाखल झालेले डॉ. राजेश पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी यांनी कुटुंबीयांना समजावले. या वेळीदेखील तणाव निर्माण झाला होता. अखेर सायंकाळी वाजता दीपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. 
 
श्वासनलिकेत अन्नाचा कण अडकल्याने मृत्यू 
युवतीचेे रक्त, लघवी सोनोग्राफीचे रिपोर्ट नॉर्मल होते. झोपलेल्या अवस्थेत तिने फळ खाल्ले, याच वेळी तिला उलटीदेखील झाली होती. श्वासनलिकेत अन्नाचा कण अडकल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मी रुग्णाला पूर्णवेळ अटेंड केले आहे. पूजेसाठी जास्त वेळ गेलो नव्हताे.
- डॉ. सी. जी. चौधरी 
बातम्या आणखी आहेत...