आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Got Pregnant Due To Repeated Rapes And Delivered Baby Boy

सातत्‍याने तिच्‍यावर केला बलात्‍कार, बाळाला जन्‍म दिल्‍यानंतर झाले असे काही...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील साकळी येथे पुरुष जातीचे अर्भक आढळल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली होती. रविवारीच (दि.22) या बालकाचा जन्म अत्याचाराच्या घटनेतून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकाराची खुद्द पीडितेने पोलिसांसमोर कबुली दिल्याने शिरसाड (ता.यावल) येथील नराधमावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

साकळीतील पीडितेची कौटुंबिक स्थिती बिक ट असल्याने ही युवती गुरे चराईचे काम करत असे. या अगतीकतेचा गैरफायदा घेत रामकृष्ण छगन राजपूत (वय 35, रा.शिरसाड) याने तरुणीला आपल्या शेतात नेऊन जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे पीडित युवती गर्भवती राहिली. रविवारी (दि.22) बालकाचा जन्म झाल्यानंतर याच नराधमाने दबाव टाकून नवजात शिशूला उकिरड्यावर टाकून देण्यास भाग पाडल्याची कबुलीही पीडितेने दिली. वेळीच हा प्रकार गावातील रवींद्र जंजाळे या युवकाच्या लक्षात आल्याने नवजात बालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे व्यथित झालेल्या पीडित युवतीने अखेर दुसर्‍या दिवशी यावल दूरक्षेत्र पोलिसांसमोर आपबिती कथन केली. तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक झाली आहे. तसेच अर्भकाला मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पीडितेविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. अंजाळे पाठोपाठ यावल आणि आता शिरसाडमधील अत्याचार प्रकरणाने तालुका हादरला आहे.