आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींची छेड काढणार्‍या रिक्षाचालकास बदडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कुसुंबा येथे रिक्षात गॅस भरण्यासाठी जात असलेल्या एका रिक्षाचालक रोडरोमियोला नागरिकांनी बदडल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजता घडली. याप्रकरणी रिक्षाचालकास एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर दुसरा तरुण फरार झाला आहे.

प्रवीण भागवत साबळे व वाजीद हे दोन तरुण बुधवारी आपल्या मालकीच्या रिक्षाने (क्रमांक एमएच 19 व्ही. 7869) गॅस भरण्यासाठी कुसुंबा येथील पंपावर जात होते. या वेळी त्यांनी रस्त्यावर पायी चालत असलेल्या दोन तरुणींची छेड काढली. हा प्रकार घटनास्थळी उभ्या असलेल्या नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी लागलीच रिक्षाचा पाठलाग करून रिक्षा पकडली. त्या दोघांची यथेच्छ धुलाई केल्यानंतर रिक्षाचालकास एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, वाजीद नावाचा त्यांचा मित्र घटनास्थळावरूनच फरार झाला. पोलिसांनी प्रवीणला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.