आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीचा अल्पवयीन मुलाने केला विनयभंग, धुळे शहरातील प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरातील बारापत्थर चौकात अल्पवयीन मुलीला पाहून इशारे करण्यात आले. हा प्रकार मुलीने सोबत असलेल्या मावशीला सांगण्याचा प्रयत्न केला असता मुलीला मारहाण करण्यात आली. तसेच ितचे कपडे ओढून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलगा अल्पवयीन आहे. 

येथील मोहाडी परिसरात राहणारी १४ वर्षीय मुलगी मावशी सोबत लग्नाला जाण्यासाठी घरून निघाली. दोन्ही चाळीसगाव येथे जाण्यासाठी बारापत्थर चौकात वाहनाची प्रतीक्षा करीत होते. त्या वेळी मुलीला पाहून एकाने अश्लील हावभाव केले. मावशीला सांगू का असे मुलीने बोलताच संबंधित मुलाने शिवीगाळ करत मुलीच्या डोक्यावर मारले. तसेच तिचे कपडे ओढून विनयभंग केला. हा प्रकार मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडला. घटनेनंतर पळ काढू पाहणाऱ्या मुलाला पकडण्यात आले. 

यानंतर पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी या मुलाला ताब्यात घेतले. अल्पवयीन असलेल्या या मुलाविरुद्ध मुलीच्या मावशीने शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून भादंवि कलम ३५४ (अ) (१) सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम सन २०१२ चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक बी. डी. पाटील या घटनेचा तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...