आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतला गळफास, साक्री तालुक्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - साक्री तालुक्यातील जैताणे येथील कोमल वाघ या तरुणीने गल्लीतील तरुणाच्या त्रासाला कंटाळून गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात तुषार जाधव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
जैताणे येथील कोमल सुनील वाघ (वय १८) हिला तुषार राजेंद्र जाधव हा त्रास देत होता. या प्रकरणी त्याला समजही देण्यात आली होती. त्यानंतरही तुषार त्रास देत होता. या त्रासामुळे कोमल तणावात होती. या मनस्तापातून कोमलने गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरी सऱ्याला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली. घटनेपूर्वी सुनील वाघ यांनी कोमलला मनस्ताप करून घेऊ नको असा सल्ला दिला होता. त्यानंतर सतीश वाघ सुनील वाघ यांच्यासह घरातील इतर सदस्य शेतात कांद्याची लागवड करण्यासाठी गेले. त्यानंतर कोमलने आत्महत्या केली. घटनेनंतर कोमलच्या नातेवाइकांनी तिचा मृतदेह जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. कोमलच्या आत्महत्येस तुषार जाधव हा जबाबदार असल्याचा आरोप करत सतीश वाघ यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...