आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव - केसी पार्क कॉलनीतील सार्वजनिक होळी सुरू असताना अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली. पोलिस पुत्र असलेल्या या युवकाविरोधात महिनाभरापूर्वी याच मुलीला छेडल्याची तक्रार पोलिसांपर्यंत आली होती. मात्र, पोलिसांनी त्याला सोडून दिले होते.
कानळदा रोड येथील केसीपार्क कॉलनीत राहणार्या निखिल कोल्हे या युवकाने होळीचा उत्सव सुरू असताना शेजारीच असलेल्या एका अल्पवयीन मुलीला उद्देशून हावभाव केले, तसेच मोठय़ाने ओरडून तिला छेडले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध कलम 509, 504, 506 आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फॉम सेक्शुअल अफेन्स बिल विषय 11चे उल्लंघन 12प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी आरोपी निखिल याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याना 10 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक उदयसिंग मोरे करीत आहेत.
पोलिसांच्या टाळाटाळीने वाढली हिंमत
आरोपी निखिल याचे वडील पोलिस आहेत. त्याने महिनाभरापूर्वी याच मुलीची छेड काढली होती. त्या वेळीही मुलीचे नातेवाईक पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य न तपासता गुन्हा नोंदवला नव्हता. आरोपी पोलिसाचा मुलगा असल्याचाही त्याला फायदा झाला होता. मात्र, आपले काहीच बिघडत नाही अशा मानसिकतेने निखिलने पुन्हा त्या मुलीची छेड काढली.
घरासमोर सार्वजनिक होळी उत्सव सुरू असताना मोठय़ाने ओरडून त्याने मुलीबद्दल अर्वाच्य शब्दप्रयोग केला. दिवसेंदिवस त्याची हिम्मत वाढत असल्याचे हे उदाहरण होते. जर पोलिसांनी महिनाभरापूर्वीच गुन्हा दाखल केला असता तर कदाचित 26 तारखेला झालेला प्रकार घडला नसता.
सुधारण्याची संधी दिली होती
यापूर्वी मुलींची छेड काढणार्या बहुसंख्य मुलांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून शिक्षण घेणार्या अनेक मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे छेड काढणार्या मुलांच्या पालकांना बोलावून समज देण्यात येते. या मुलालाही अगोदर समज देण्यात आली. परंतु त्याने पुन्हा चूक केल्यामुळे कायद्यानुसार आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छेड काढणारा कोणाचाही नातलग असला तरी त्यावर गय केली जाणार नाही. एस. जयकुमार, पोलिस अधीक्षक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.