आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girls Gives Response To Designer Clothes For Daily Use

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दैनंदिन वापरातही तरुणींकडून डिझायनर कपड्यांना पसंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एखाद्या विशिष्ट समारंभ किंवा मोठ्या कार्यक्रमासाठी आपण डिझाइनर कपडे परिधान करण्यासाठी पसंती देतो. मात्र, सध्या दैनंदिन वापरासाठी देखील तरुणींना डिझायनर ड्रेसची भुरळ पडली आहे. बाजारात सध्या अनेक डिझायनर कपडे पाहायला मिळत आहेत. मेट्रो सिटीतील हा ट्रेंड आता जळगावातही अवतरला असून साधारण कपड्यांपेक्षा फॅशनेबल लूक आणि अपडेट राहण्यावर तरुणींचा भर आहे.
सिझनेबल ड्रेसेसही खासकरून पाहायला मिळत आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेसप्रमाणे किंवा चित्रपटातील ताऱ्यांनी घातलेले ड्रेस असो आदी प्रकारच्या ड्रेसची मागणी तरुणींकडून होत आहे. म्हणूनच या डिझायनर कपड्यांमध्ये अनारकली लाँग लेन्थपासून ते जंपसूट सारख्या पाश्चात्य ड्रेसपर्यंत बाजारात ड्रेस उपलब्ध झाले आहेत. फॅब्रिक आणि रंगातही हवे तेवढे पर्याय दुकानदारांनी उपलब्ध करून दिले आहेत.
पाश्चात्य ड्रेसेसला पसंती
जिन्स आणि टॉपमध्येही अनेक प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत. यात पॅन्टसमध्ये खूप प्रकार पाहायला मिळतात. जेगिंग्ज आणि कॉटन पॅन्टमध्ये प्रिंटेड पॅन्टसला जास्त मागणी आहे. बारीक फ्लॉवर प्रिंट यात खासकरून पाहायला मिळते. यातही भरपूर रंग उपलब्ध आहेत.
खासकरून रेड, ब्लू, यलो, डार्क ब्लू, ब्राऊन रंग आहेत. ब्राऊन रंगातही निरनिराळ्या शेड्स आहेत. तसेच पायजमा पॅन्टस् हा नवीन प्रकार असून कॉटन प्रकारात हेरम सारखी ही पॅन्ट असते. तिला खिसेदेखील असतात. आरामदायी हा पायजमा, पॅन्ट असून टी-शर्ट शॉर्ट टॉप यात वापरला जातो. ५०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत या रंगीबेरंगी प्रिंटेड पॅन्टस बाजारात विक्रीस आहेत. त्यांना तरुणींकडून मोठी मागणी असल्याचे िवक्रेत्यांनी सांगितले.
जंपसूटचा वेगळा प्रकार
सध्या जंपसूट, पार्टिवेअर सिंगल मॅक्सी ड्रेस, फ्रॉक स्टाइल ड्रेस पाहायला मिळत आहे. जंपसूटमध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत. संपूर्ण एकाच कापडाचा असणारा हा ड्रेस असतो. याला कमरेवर बेल्ट दिलेला असतो. शक्यतो ब्लॅक आणि व्हाइट, पिंक, पिच, ग्रे किंवा ऑफ व्हाइट सारख्या लाइट रंगात बारीक प्रिंटचे हे जंपसूट आकर्षक दिसतात. यात हटके लूक हवे असल्यास नेव्ही ब्ल्यू आणि ऑरेंज रंगासारख्या भडक रंगाचाही उपयोग केला जातो.
वजनाने हलक्या अशा कॉटन, जार्जेट, शिफॉन सारख्या मटेरीयलमध्ये तयार केलेला हा जंपसूट अत्यंत फॅशनेबल लूक देतो. जळगावात सध्या याची क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. ऑनलाइन शॉपिंगमध्येही याप्रकारात खूप मागणी आहे.