आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींचा अबोला ठरू शकतो घातक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरात तरुणींची छेडखानी करण्याचे प्रमाण वाढत आहे. समाजात बदनामी होईल याला घाबरून तरुणी गप्प राहतात. यामुळेच या रोडरोमिओंची हिंमत वाढत आहे. या प्रकाराला वेळीच आळा घातला नाही तर मोठा अनर्थ घडू शकतो. तरुणींनी या घटनांना प्रखरपणे प्रतिकार करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शहरातील विद्यार्थिनी प्रगती(नाव बदलले आहे) जेव्हा महाविद्यालयातून घरी जात असे, त्यावेळी एक तरुण तिची छेडखानी करीत असे. समाजात होणारी बदनामी आणि पालकांचा दबाव यामुळे प्रगती त्या तरुणाला विरोध करू शकली नाही. कारण तिला भीती होती. हा प्रकार वाढल्यानंतर तिचे घरून निघणेच बंद झाले. काही दिवसानंतर त्या तरुणाने प्रगतीच्या महाविद्यालयात जाऊन तिच्यावर थेट चाकूहल्ला केला. यात प्रगती जखमी झाली.

असे प्रकार अनेकदा शहरात घडत आहेत. सुरुवातीलाच तरुणी या अशा प्रकारांना विरोध करीत नसल्यामुळे हे प्रकार वाढत आहेत. तरुणींनी सुरुवातीच्या काळात छोट्या छोट्या प्रकारांना विरोध न केल्यामुळेच अशा मोठय़ा घटना घडत आहेत. तरुणींनी या प्रकाराबाबत आपल्या पालकांकडे तक्रारी केल्यास हे प्रकार कमी होऊ शकतात व त्यावर उपायदेखील निघू शकतो. छेडखानीच्या घटना रोखण्यासाठी पालकांसह मुलींनीही प्रखरपणे विरोध करायला हवा.

महिन्याला 10 ते 12 केसेस
पोलिस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक महिन्याला 10 ते 12 केसेस अशा प्रकारच्या येत राहतात. समाजातील खुलेपणामुळे असे प्रकार घडत आहेत. तरुणींना जबरदस्तीने मनविण्याची तरुणांची मानसिकता बनत चालली आहे. कदाचित तरुणीने विरोध केला तर तरुण उग्र होऊन काहीही करण्यास तयार होतात. यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांवर नजर ठेवणेही खूप गरजेचे आहे.

मुलांशी पालकांनी करावा मैत्रीपूर्ण व्यवहार
0 पालकांनी आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे. महाविद्यालयातील अनुभव शेअर करायला हवेत. जेणेकरून मुले महाविद्यालयात जाताना काळजी घेतील.
0 मुलींना छोट्या छोट्या गोष्टी सांगून सद्य:स्थितीचे ज्ञान उपलब्ध करून दिले पाहिजे. हिंमत वाढविण्यासाठी प्रय} करावेत.
0 आपल्या मुलांचे फेसबुक , ट्विट अकाउंटबाबत माहिती ठेवा. त्याच्यावरील स्टेटसची नेहमी माहिती घेत रहा.
0 महिन्यातून दोनदा मुलीला महाविद्यालय व कोचिंग क्लासपर्यंत सोडा. लोकांशी चर्चा करा.
0 मुलांचे फोन, एसएमएसच्या बाबतीत माहिती नेहमी घेत रहा.

पालकांशी ‘शेअर’ कराव्यात मुलांनी गोष्टी
0 घरात पालकांशी मुलांनी सर्व समस्या व गोष्टी ‘शेअर’ कराव्यात. महाविद्यालयात किंवा शिकवणीला जाताना काही समस्या असतील तर त्याबाबत पालकांना जरूर कळवा. पालक आपले हितचिंतक असतात हे नेहमी लक्षात ठेवावे.
0 रात्रीच्या वेळी एकटे घराच्या बाहेर जाऊ नये, सुनाट रस्त्याने जाणे नेहमीच टाळावे.
0 मोबाइल रिचार्ज कूपनच्या सहाय्यानेच करावे. कोणत्याही परिस्थितीत मोबाइल दुकानावर फोन नंबर देऊ नका.

सुरक्षेसाठी कर्मचारी
शहरातील सुनाट भागात तसेच महाविद्यालयांच्या परिसरात छेडखानीच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडतात. त्यातल्या त्यात संमिर्श महाविद्यालय व महिला महाविद्यालयांच्या परिसरात होणार्‍या या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्तीपथके तैनात केली आहेत. ही पथके शहरातील विविध भागात गस्तीवर असतात. त्यामुळे असे प्रकार समोर दिसल्यास ते लागलीच रोखतात.