आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Priority To Water Scarcity, Jalyukta Shivar Work

पाणीटंचाई, ‘जलयुक्त शिवार’च्या कामांना प्राधान्य द्या - जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - यंदा दुष्काळाची स्थिती असल्याने येथून पुढील दाेन ते तीन महिने केवळ टंचाई निवारणाच्या उपाययाेजना अाणि ‘जलयुक्त शिवार’च्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिल्या. जिल्ह्यातील पाणीटंचाई अाणि अन्य कामांचा अाढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हा नियाेजन सभागृहात महसूल, जिल्हा परिषद, कृषी विभाग, वनविभाग अधिकाऱ्यांची बैठक अायाेजित केली हाेती.

या वर्षी १,२५८ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती अाहे. पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांना तत्काळ पर्यायी व्यवस्था करून पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे निर्देश अाहेत. त्या पार्श्वभूमीवर टंचाई अाणि ‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या कामांचा अाढावा घेण्यात अाला. अनेक कामे अपूर्ण अाहेत. तसेच कामांवर पुरेसा निधी खर्च केल्यामुळे नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषद गटविकास अधिकाऱ्यांच्या कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी जिल्हा परिषदेचे सीईअाे अास्तिककुमार पांडेय, गुलाबराव खरात अधिकारी उपस्थित हाेते.

जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती
४३ गावे- ३६ टँकर, १८७ गावे- १८२ विहिरींचे अधिग्रहण, ५६ गावे- ४१ तात्पुरत्या पाणीपुरवठा याेजना, ३५६ गावे- ८१३ नवीन विंधन विहिरी, ६३ गावे- ९० कूपनलिका, २५ गावे- २५ विहिरींचे खाेलीकरण, गावे- नळ पाणीपुरवठा याेजनांची दुरुस्ती.