आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सणांना सुटी देण्याचे अधिकार शाळांना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्थानिक सण-उत्सवांना सुटी देण्याचे अधिकार आता शाळांना देण्यात आले आहेत. पूर्वी शिक्षण विभागाकडून सुट्यांचे नियोजन केले जात होते. मात्र, त्यामुळे स्थानिक सणांच्या सुट्याच मिळत नव्हत्या. त्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी घेताना अनेक अडचणी येत होत्या, हे शालेय शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यामुळे शाळांना सुटी देण्याचे अधिकार पालक-शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धार्मिक सणांसाठी सुटी हवी असल्यास त्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती पालक-शिक्षक संघाला देण्यात आले आहेत. राज्यातील विविध संघटनांनी धार्मिक सणांसाठी सुटीची मागणी केल्यानंतर हे अधिकार किंवा सुटीत बदल करण्याचा निर्णय आता शाळांना देण्यात आला आहे. मात्र, सुटी देत असताना आरटीई नियमानुसार पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी २०० दिवस आणि ८०० घड्याळी तास आणि सहावी ते आठवीच्या वर्गासाठी २२० दिवस हजार घड्याळी तास पूर्ण करणे सक्तीचे असणार आहे. माध्यमिक शाळा संहिता-नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त देता येत नाहीत. तसेच कामाचे दिवस २३० होणेही आवश्यक आहे. मात्र, धार्मिक सणांचे निमित्त साधून विविध संघटना आणि पक्षांकडूून सणांसाठी सुटी देण्याची मागणी होत होती. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने आरटीई नियमांचा आधार घेत शाळा व्यवस्थापन समिती पालक-शिक्षक संघाची सहमती, शिफारशी आणि स्थानिक मागणीनुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना सुटी द्यावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे. त्याचप्रमाणे सुटीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करण्यात येऊ नये, असेही त्यात म्हटले अाहे.
स्थानिक सणांसाठी अदलाबदल
^वर्षभरात७६ सुट्या देण्यात येतात. त्यात कमी-जास्त असा बदल होणार नाही. मात्र, स्थानिक सण-उत्सवांसाठी सुट्यांची अदलाबदल करता येणार आहे. देविदासमहाजन, शिक्षणाधिकारी,माध्यमिक

स्थानिक प्रथा-रूढींसाठी प्रयत्न
प्रत्येकजिल्ह्याला विविध पारंपरिक सण, प्रथा-रूढींची परंपरा लाभली आहे. मात्र, त्या दिवशी सर्वच जिल्ह्यांना सुटी असेल अशी परिस्थिती नव्हती. आता आवश्यकतेनुसार सुटी बदलण्याचे अधिकार शाळांना मिळाले असून, त्यातून पारंपरिकता जपणे सोपे होणार आहे.