आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीके, भूगोलाच्या अभ्यासासाठी अॅप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ऑनलाइन अभ्यासाकडे सध्याच्या तरुणाईने लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही विषयाची सखोल माहिती मिळावी म्हणून तंत्रज्ञान त्यांच्या पाठीशी आहे. अनेक विषयांच्या सखोल अभ्यासासाठी आता बाजारात विशिष्ट प्रकारचे मोबाइल अॅप उपलब्ध झाले आहेत. त्याचा उपयोग वदि्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या वदि्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अॅप गुगल प्लेमधून उपलब्ध होत आहेत. अभ्यासक्रमासंदर्भात संकेतस्थळ, अॅप्लिकेशन्स तयार करण्यात आले आहे. यात इंडियल लॉ अॅण्ड आर्टिकल्स, पॉलिटिक्स इन हिंदी, यूपीएससी, आयएएस, एसएससी हिंदी ही अॅपही सध्या जास्त वापरली जात आहेत. ऑनलाइन अभ्यास करण्याकडे वदि्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता या सुविधा बाजारात झपाट्याने वाढत आहेत.

जीओग्राफी, जीके इन हिंदी :या अॅपमध्ये भूगोल विषयासंदर्भात अपडेट माहिती मिळते. सौरमंडळ, पृथ्वी, पठार, मैदान, नद्या, धबधबे, सागर आणि खनिज संपत्तीसंदर्भात सखोल माहिती या अॅपमध्ये उपलब्ध आहे.

इकॉनॉमिक्सइन हिंदी : यातअर्थशास्त्राविषयी माहिती आहे. अर्थशास्त्राची परिभाषा, भारतीय अर्थव्यवस्था, कृषी अर्थव्यवस्था सारख्या महत्त्वूपर्ण बाबी यात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हिस्ट्रीजीके : याअॅपमध्ये भारत विश्व आणि भारताचा इतिहास यासंदर्भात माहिती आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासह अन्य माहिती एकत्रित उपलब्ध आहे.

नासाअॅप : यातनासा मिशनशी जुडलेली सर्व माहिती देण्यात आली आहे. अंतराळातील आकर्षक महत्त्वपूर्ण छायाचित्र या अॅपमध्ये पहायला मिळतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट लवकर लक्षात येते.

यूट्यूब एज्युकेशन : यालिंकवर एज्युकेशनसंदर्भात अनेक व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अभ्यासक, संशोधकांची भाषणे, लेक्चर यात उपलब्ध आहे.
http://www.youtube.com/education वर माहिती उपलब्ध आहे.

एनसीईआरटीव्हिडिओ : यासंकेतस्थळावर एनसीईआरटीचे पुस्तके, अभ्यासक्रमाविषयी समस्या यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. यासाठी वदि्यार्थी http://www.youtube.com/user/CBSEchannel वर माहिती काढू शकतात.