आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Go From Jalgaon To Mumbai By Volvo ST Corporation

जळगावहून ‘व्हाॅल्व्हो’ने जा मुंबईला - एसटी महामंडळाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एसटी महामंडळाच्या प्रवासी सुविधांच्या तुलनेत खासगी बसमध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत असल्याने प्रवाशांचा ओढा या सेवेकडे वाढत आहे. यावर पर्याय म्हणून उशिरा का होईना, आता खासगी सुविधेच्या तोडीस तोड देण्यासाठी एसटी महामंडळाने व्हॉल्व्हो बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला अाहे. जिल्हाभरातून सहा व्हॉल्व्हो बसेस औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर या शहरांकडे धावणार अाहेत.

तोट्यातील बससेवेला बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळ विविध उपक्रम राबवत आहे. खासगी बससेवेच्या विरोधात दाखल याचिकेवर न्यायालयाने राज्य सरकारला वारंवार बजावले आहे. तसेच बसस्थानकांच्या आवारातून प्रवासी उचलणाऱ्या खासगी बससेवेला रोखण्यासाठी सरकारने उपाय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उच्च न्यायालयाने वारंवार बजावल्यानंतर राज्य सरकारने आता राज्यभर एसी बसेस स्लिपर कोच सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
खासगी वाहतुकीला तोड देणारी सेवा
एसटी महामंडळाच्या विविध विभागांकडे असलेली कोट्यवधींची थकबाकी वसूल होत नसल्याने ही सेवा कायम सुरू ठेवण्यासाठी कटू निर्णय घेण्याच्या मानसिकतेत महामंडळ आहे. विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू अन्य दिल्या जाणाऱ्या एसटीच्या सवलती का बंद करू नये, असा सवालही महामंडळाने शासनाला केला आहे. दरम्यान, खासगी बससेवेच्या तुलनेत अधिक चांगली सेवा देणारा पर्याय उपलब्ध व्हावा, या विचारातून राज्यात व्हॉॅल्व्हो बससेवेला व्यापक स्वरूप देण्याच्या विचारात एसटी महामंडळ आहे. याकरिता महामंडळ प्रशासनाने प्रत्येक आगारातून व्हॉल्व्हो बससेवा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मागवले होते.
व्हॉल्व्होबरोबर स्लिपर सेवाही
व्हॉल्व्होबरोबरचएसी स्लिपर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे उत्पन्नातही वाढ होईल, अशी अपेक्षा महामंडळाला आहे.

प्रस्ताव पाठवला
महामंडळाच्या व्यवस्थापनाने यासंबंधीचा निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. याबाबत प्रस्तावही मागितले आहे. त्यानुसार सहा व्हॉल्व्हो बसेसचा प्रस्ताव पाठवला अाहे. तीन तालुक्यांतून एक, अशा प्रमाणे या बसेस दिल्या जातील. मात्र, यासंबंधीचे नियोजन अंतिम नाही. एस.बी.खडसे, आगारप्रमुख