आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-मेलद्वारे वीजबिल; 3 रुपयांची सवलत, पर्यावरण जागृतीसाठी ‘गो ग्रीन’ उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ई-मेलद्वारे वीजबिल स्वीकारणाऱ्या ग्राहकास बिलामागे तीन रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीने पर्यावरण जागृतीसाठी ‘गो ग्रीन’ हा उपक्रम सुरू केल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली.
 
महावितरणतर्फे ‘गो-ग्रीन’ सेवा उपक्रमांतर्गत ग्राहकांना ईमेलद्वारे वीजबिल उपलब्ध करून देते. गो-ग्रीन चा पर्याय निवडल्यास नोंदणीकृत ईमेलवर ग्राहकांना मासिक वीजबिलाच्या छापील प्रतीऐवजी ई-बिल प्रत दरमहा प्राप्त होते. ई-बिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना दरमहा मासिक वीजबिलात तीन रूपये सवलत दिली जाणार आहे.
 
महावितरणच्या www.mahadiscom.com या अधिकृत संकेतस्थळावर ग्राहकांकरीता ‘गो-ग्रीन’ चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यासाठी ग्राहकांना आपल्या चालू मासिक वीजबिलाचा छापील प्रतीवरील ग्राहक, बिलिंग युनिट आणि गो ग्रीन क्रमांक (बील नंबर) च्या सहाय्याने या सेवेकरीता नोंदणी करता येईल. ग्राहकांनी गो ग्रीन सेवेकरीता नोंदणी करण्यापूर्वी आपण आपल्या खात्यावर ई-मेल पत्ता नोंदवल्याची खात्री महावितरणच्या वेब सेल्फ सर्व्हिसच्या http://wss.mahadiscom.in/wss/wss या लिंकवर करावी अथवा सदरच्या लिंकवर नवीन खाते तयार करून तो नोंदवावा, असेही महावितरणने कळवले आहे.
बातम्या आणखी आहेत...