आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा एक्स्प्रेसचे इंजीन भुसावळ स्टेशनवर घसरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दिल्लीकडून येणार्‍या गोवा एक्स्प्रेसला भुसावळात इलेक्ट्रीक इंजीन काढून पुण्याकडील प्रवासासाठी डिझेल इंजीन लावले जाते. सकाळी 6.15 मिनिटांनी भुसावळ जंक्शनवरील फलाट क्रमांक एकजवळ डिझेल इंजीन गाडीला जोडणीसाठी आणले जात होते. या इंजीनची चार चाके अचानक रुळावरून घसरली. रेल्वेच्या आत्पकालीन विभागाने तातडीने दुरुस्ती करून रहदारीसाठी मार्ग खुला केला.

चार गाड्यांना झाला अर्धातास उशीर
अप लाइनवर गोवा एक्स्प्रेसच्या डिझेल इंजीनची चाके घसरल्याने छपरा एक्स्प्रेस, महानगरी, भुवनेश्वर एक्स्प्रेस आणि झेलम एक्स्प्रेस या गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावल्या. सकाळी 6.30 वाजता भुसावळ स्थानकाहून सुटणारी गोवा एक्स्प्रेस तब्बल पावणेदोन तास उशिराने म्हणजेच 8.20 ला रवाना झाली. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते.