आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिका-यांनी हात वर केल्याने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुलपाठोपाठ गोलाणीच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या महापालिकेत सध्या अधिकारी वर्ग प्रचंड सावध भूमिका घेत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चौकशी करणाऱ्या अधिका-यांनी गुन्हा दाखल करण्याप्रसंगी दोन पाऊल मागे घेतले. बदलीस पात्र असताना शेवटच्या काळात फिर्यादी होऊन चकरा मारणे टळावे, या उद्देशाने फिर्यादी होण्यास नकार दिला. त्यामुळे नाइलाजास्तव आयुक्त संजय कापडणीस यांना पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागल्याचे बोलले जात आहे.

जळगाव महापालिका आणि घोटाळे, अधिकारी आणि पोलिस चौकशी, असे सूत्र झाल्यामुळे महापालिकेत काही ना काही निमित्ताने पोलिसांच्या चकरा सतत सुरू असतात. जुन्या प्रकरणातील पत्रव्यवहार त्यासाठी लागणारी माहिती, यामुळेही विभागप्रमुख पोलिस अधिकारी यांचा संबंध सतत येत असतो. घरकुल प्रकरणानंतर याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. नगरपालिका असताना घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे पालिकेत आगामी काळात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता अधिकारी वर्ग सतत वर्तवत असतो. आता गोलाणीच्या निमित्ताने पुन्हा त्या चर्चेला बळकटी मिळाली आहे.


फिर्यादीवर आयुक्तांच्या टीमने केले दविस काम
गोलाणी मार्केटच्या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात जानेवारी २०१५ रोजी आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार मुख्य लेखापरीक्षक एस.बी.भोर यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त प्रदीप जगताप, नगररचना विभागाचे सहायक संचालक चंद्रकांत निकम तत्कालीन शहर अभियंता सी.जी.पाटील यांची समिती गठीत करण्यात आली होती. शहराभियंता पाटील सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा काही संबंध राहिला नाही. गेल्या महिन्यात समितीने चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर केला आणि सलग तीन दविस आयुक्त त्यांच्या टीमने फिर्याद तयार करून घेतली. यात कोणत्या मुद्यांचा संदर्भ द्यायचा यावर बारीकसारीक अभ्यास करून निर्णय घेण्यात आला.

घरकुलमुळेअधिकाऱ्यांनी घेतली सावध भूमिका
घरकुलघोटाळ्याचे कामकाज सध्या धुळे येथे सुरू आहे. या खटल्यात मनपातील तत्कालीन वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिका-यांची फिर्यादी म्हणून नावे आहेत. त्यांना अनेक वेळा सुनावणीसाठी धुळे येथील न्यायालयात हजर राहावे लागते. या हेलपाट्यांना हे मनपा कर्मचारी वैतागले आहेत. हा अनुभव पाहता गोलाणी प्रकरणात फिर्याद देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले हात झटकले असल्याचे बाेलले जात आहे.

बंगल्यावरून चालतोय कारभार
गोलाणीप्रकरणात फिर्याद देण्यापूर्वी सलग दोन ते तीन दविस आयुक्त पालिकेत फिरकले नव्हते. आता फिर्याद दिल्यानंतर गेले दोन दविस कार्यालयातच आले नाहीत. यामुळे पालिकेचा प्रशासकीय कारभार सध्या आयुक्तांच्या निवासस्थानावरून सुरू आहे. शहर पोलिसांनी आयुक्तांच्या फिर्यादीत काही त्रुटी काढल्या आहेत. त्याचा खुलासा करण्याचे काम गेल्या दोन दविसांपासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मागितलेली स्पष्ट, मुद्देसूद फिर्याद शुक्रवारी सायंकाळपर्यंत तयार करणे सुरू होते.

अधिका-यांचा नकार आणि पंचाईत
आयुक्तांनीफिर्याद तयार करून दाखल करण्यापूर्वी चौकशी समितीतील सदस्यांव्यतिरिक्त आणखी काही विभागप्रमुखांची चाचपणी करून घेतली. यात काही वरिष्ठ अधिका-यांशी आयुक्तांनी एकट्यात चर्चाही केली. परंतु, ऐन बदलीचा काळ जवळ आलेला असताना फिर्यादी होऊन पुन्हा जळगावशी जुळून राहणे नाकारले. अत्यंत किचकट गुंतागुंतीच्या या प्रकरणात न्यायालयीन चकरा मारणे आता नको, अशी भूमिका घेत अधिका-यांनी या प्रकरणात फिर्यादी होणे नाकारले. आपल्या अधिका- यांनी स्पष्ट नकार दिल्याने आयुक्त कापडणीस यांनाच फिर्यादी होण्याचे शविधनुष्य पेलावे लागल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे