आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गोलाणी’च्या फिर्यादीमुळे माजी नगरसेवक धास्तावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गोलाणीमार्केट सतरा मजली इमारतींप्रकरणी आयुक्तांनी दाखल केलेल्या फिर्यादीची नोंद आज ना उद्या होणारच आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार शंकांचे निरसन करण्याचे काम सुरू असून आरोपींची नावे स्पष्ट केली जात आहेत. त्यामुळे अनेक ‘साठी’ ओलांडलेले माजी नगरसेवक धास्तावले आहेत.

तत्कालीन नगरपालिकेच्या सत्ताधा-यांनी गोलाणी मार्केटच्या उभारणीसंदर्भात वेगवेगळे १३ ठराव करून पालिकेचे हित जोपासता विकासकाचे हित जोपासल्याचा ठपका आहे. यात पालिकेचे २१० कोटी ७२ लाखांचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात आयुक्त संजय कापडणीस यांनी जुलैला शहर ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात अद्याप गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही. पोलिसांनी आयुक्तांना पत्र देऊन त्यात काही शंका उपस्थित केली आहे. त्यातील मुद्दे स्पष्ट केल्यानंतरच गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यात कोणत्या नगरसेवकांचा कसा संबंध आहे, याचीही विचारणा पाेलिसांनी केली आहे. यामुळे सध्या शहरातील जुन्या राजकीय पदाधिका-यांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. सध्या नगरसेवक असलेल्या अनेकांच्या आजी-आजोबा, सासरे-सासू यांनी पूर्वी नगरसेवकपद भोगले होते. आज त्यांची परंपरा घरातील अन्य सदस्यांकडून चालवली जातेय. त्यामुळे आराेपींमध्ये आपलाही समावेश आहे का? यादृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे.

वृद्धापकाळातटेन्शन : गोलाणीप्रकरण १९८८ पासूनचे आहे. या काळात आज निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांचे आजोबा-पणजोबा नगरसेवक होते. यातील बहुसंख्य माजी नगरसेवकांचे वय ६० ते ७० आहे. त्यामुळे जर गोलाणी प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अटक सत्र राबवले गेले, तर आयुष्यभर ऐटीत घालवलेल्या माजी नगरसेवकांना पोलिस ठाण्याच्या फे-या माराव्या लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सरसावले आहे.

मुले,नातवांना टेन्शन :तत्कालीन नगरसेवकांच्या मुलांना नातवंडांमध्ये गोलाणीप्रकरणामुळे प्रचंड टेन्शन आले आहे. त्यामुळे अनेक जण मनपात अर्ज करून माहितीही घेताहेत. तर काहींनी फिर्यादीतील मुद्दे गोलाणी प्रकरणासंदर्भात वकिलांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.

ठरावांचा अभ्यास करतोय
घरकुलआणि गोलाणी प्रकरणाची तुलना होऊ शकत नाही. सन १९९५मध्ये मीसुद्धा नगरसेवक होताे. त्यामुळे तेव्हा केलेले ठराव राज्य शासनाचे निर्देश यांचा अभ्यास सुरू आहे. सभागृहाने निर्णय घेतल्यास कामे कसे होतील. माजीनगरसेवक

कामेकरणे कठीण होईल
गोलाणीच्या बांधकामात केलेल्या ठरावांमुळे नुकसान झाले, ही बाब २० वर्षांनंतर कळते आहे. त्यामुळे आता ठराव करायचे तरी कसे? मात्र यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण आहे. असेच सुरू राहिल्यास कोणतेच निर्णय होणार नाहीत. विद्यमाननगरसेवक