आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेलाणीच्या अहवालात टाळाटाळ, सहा अधिकाऱ्यांचे वेतन राेखले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गाेलाणी मार्केटच्या विशेष लेखापरीक्षण अहवालात नोंदवलेल्या २३ अाक्षेपांचा अनुपालन अहवाल सादर करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंगाशी अाले अाहे. चारवेळा पत्र देऊनही टाळाटाळ करणाऱ्या सहा विभागप्रमुखांचे वेतन राेखण्याची कारवाई केली अाहे. ३० सप्टेंबरपर्यंत उत्तर दिल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
घरकुल घाेटाळ्यानंतर पालिकेच्या गाेटात खळबळ उडवून दिलेल्या गोलाणी अर्थात व.वा. व्यापारी संकुलासह सतरा मजली इमारतीच्या बेकायदा बांधकामप्रकरणी राज्य शासनामार्फत विशेष लेखापरीक्षण करण्यात अाले हाेतेे. त्याचा अहवाल येऊन तीन महिने उलटले अाहेत. यात सहा विभागांशी निगडीत २३ आक्षेप नोंदवण्यात अाले अाहेत. या अाक्षेपांसंदर्भात अहवाल प्राप्तीनंतर चार महिन्यांत पालिकेची भूमिका शासनाला कळवायची अाहे. त्यापूर्वी अाक्षेपांवर विभागप्रमुखांकडून अनुपालन अहवाल मागवण्यात अाले अाहेत. अनुपालन अहवाल अाल्यानंतर त्याची तपासणी करून महासभेत सादर करावा लागणार अाहेे. यासाठी अाॅक्टाेबर ही अंतिम मुदत असून त्यादृष्टीने तातडीने अनुपालन अहवाल प्राप्त हाेणे गरजेचे अाहे. विभागप्रमुखांना यापूर्वी चारवेळा स्मरणपत्र देऊनही त्यांच्याकडून अद्याप एकही अहवाल सादर करण्यात अालेेला नाही. अत्यंत महत्त्वाच्या विषयात विभागप्रमुखांनी चालवलेल्या वेळकाढूपणामुळे अायुक्त जीवन साेनवणे यांनी सर्व सहा विभाग प्रमुखांचे वेतन राेखले.

पुढच्या कारवाईत विलंब
तत्कालीन अायुक्त संजय कापडणीस यांनी गोलाणी प्रकरणात २१० काेटींच्या नुकसानीचा ठपका ठेवत पाेेलिसांत तक्रार दिली हाेती. त्यानंतर शासनाच्या विशेष लेखापरीक्षणात १२ काेटी रुपयांची अनियमितता दर्शवली अाहे. २३ अाक्षेपांवर अद्याप अनुपालन अहवाल अालेेला नाही. त्यामुळे पालिकेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे अहवाल तपासताच गुन्हा दाखल करणे योग्य हाेणार नाही. त्यामुळे तातडीने अनुपालन अहवाल मागवले अाहेत.

...तर निलंबनाची कारवाई होणार
शासनाला अहवाल कळवायचा असल्याने अत्यंत महत्त्वाच्या विषयात जर अधिकारी भोंगळ कारभार करत असतील तर त्यांच्यावर ३० सप्टेंबरनंतर कडक कारवाई करण्याचा इशारा अायुक्तांनी दिला अाहे.

बातम्या आणखी आहेत...