आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेलाणीसह १७ मजलीचे 4 पासून लेखापरीक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तत्कालीन नगरपालिकेने राबवलेल्या व.वा.व्यापारी संकुल (गाेलाणी मार्केट) १७ मजली इमारतीच्या विशेष लेखापरीक्षणासाठी पथकाची घाेषणा करण्यात अाली अाहे. सहायक संचालक ध.सा.अांधळे यांच्या नेतृत्वात एप्रिलपासून १३ वर्षांचे लेखापरीक्षणाच्या कामाला सुरुवात हाेत अाहे.
गाेलाणी मार्केट १७ मजली इमारतीच्या बांधकामात २२० काेटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार अायुक्त संजय कापडणीस यांनी पाेलिस ठाण्यात केली अाहे. अायुक्तांनी मागणी केल्याप्रमाणे गाेलाणी मार्केटच्या बांधकामाचे विशेष लेखा परीक्षण करण्यास मान्यता देण्यात अाली अाहे.

असे असेल पथक
राज्याच्या स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे सहायक संचालक ध.सा.अांधळे यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे. त्यांच्यासाेबत पथकात लेखापरीक्षा अधिकारी सं.चं.देसाई, अाैरंगाबाद येथील सहायक लेखापरीक्षा अधिकारी दि.अा.वाघ, जळगावचे सहायक लेखापरीक्षा अधिकारी दि.ने.भारंबे यांची वरिष्ठ लेखापरीक्षक म्हणून तर दि.भा.पाटील यांची कनिष्ठ लेखापरीक्षक ज्ञा.रा.पवार यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. एप्रिल १९८८ ते ३१ मार्च २००१ या कालावधीतील विशेष लेखापरीक्षण एप्रिलपासून सुरू करण्यात येणार अाहे.