आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीकेंडला चोरट्यांचा दणका; मंदिरातील दानपेटी; तर एसटीतून महिलेचे सोने, रोकड लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शनिवारी रात्री गोलाणी मार्केटमधील तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्नही झाला.रविवारी मार्केट बंद असते. त्यामुळे चोरी झाल्याच्या घटना उघडकीस येण्यास उशीर होतो. याशिवाय शनिवारी रात्री अनेक दुकानदार आपले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद करून ठेवतात. ही संधी साधत चोरट्यांनी गोलाणी मार्केटच्या ‘जी’ विंगमधील मनीष मोबाइल शॉपी, महाकाली मोबाइल आणि शीतल मोबाइल या तीन दुकानांचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकही दुकानाचे कुलूप तुटल्यामुळे चोरी करता आली नाही. रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला.
जळगाव-चोपडा बसमधून प्रवास करणाऱ्या मथुराबाई जगन्नाथ महाजन (वय ७२, रा. हिंगोणे, ता. धरणगाव) यांच्या पिशवीतील १५ ग्रॅम सोन्याच्या चीप आणि तीन हजार रुपयांची रोकड लंपास केली. शनिवारी दुपारी जळगाव ते धरणगावदरम्यानच्या प्रवासात हा प्रकार घडला. मथुराबाई यांनी जळगाव शहरातून ४० हजार रुपयांच्या सोन्याच्या चीप विकत घेतल्या. त्या घरी घेऊन जाण्यासाठी त्यांनी बसस्थानकातून बस पकडली. धरणगाव येथे बसमधून उतरल्यानंतर त्यांची हातातील पिशवीला खालच्या बाजूने ब्लेड मारून फाडलेले आढळून आले. जिल्हापेठ ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला.
शनिवारी रात्री हरिविठ्ठलनगरातील गजानन महाराज मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली, तर गोलाणी मार्केटमधील तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथील महिलेच्या पिशवीतील सोने आणि रोख लंपास केले. यापूर्वीही शनिवारीच भरदिवसा बाजारपेठेत, बस रेल्वेस्थानकावर, तर रात्री मार्केटमध्ये चोऱ्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

रामानंदनगर परिसरात घरफोडी
१६ ऑगस्ट : रामानंदनगरपरिसरातील अभिराम अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून दीड लाख रुपयांचे दागिने २७ हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना दुपारी ११.३० ते वाजेदरम्यान घडली होती. सुधाकर पुंडलिक टोके यांच्या मालकीचा हा फ्लॅट आहे. शनिवारी सकाळी टोके कुटुंबीय घराबाहेर पडल्यानंतर ही घटना घडली होती.
गोलाणी, नवीपेठेत चारी
२४ ऑगस्ट : शहरपोलिस ठाण्यापासून जवळच तीन, तर गोलाणी मार्केटमधील एक अशी एकूण चार दुकाने या रात्री तीन चोरट्यांनी फोडली. तसेच नवीपेठ भागातील सुरेश कलेक्शन गोलाणी मार्केटमधील जी.व्ही.मोबाइलमधून मोबाइल चोरीस गेले आहेत. यासह गीता होजिअरी आणि फोम अॅण्ड फॅब्रिक्स येथे केवळ चोरीचा प्रयत्न केला होता.