जळगाव : येथील व.वा.व्यापारी संकुलाच्या बांधकामात तत्कालीन नगरपालिकेचे अार्थिक नुकसान झाल्याप्रकरणी दाखल झालेली याचिका अाैरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी फेटाळून लावली. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्या मालमत्तेचे मूल्य अाज अनेक पटीने वाढले अाहे. त्यामुळे अाजच्या स्थितीत पुन्हा उलटे जाऊ इच्छित नाही.
घड्याळाचे काटे उलटे फिरवणे याेग्य नसल्याचे मत देत न्यायालयाने अापला निर्णय जाहीर केला अाहे. १९९७ साली दाखल झालेल्या याचिकेवर २० वर्षांनी निकाल लागला. तत्कालीन नगरपालिकेने चार मजली व.वा.व्यापारी संकुल बांधण्यासाठी गाेलाणी ब्रदर्स यांना बीअाेटी तत्त्वावर दिलेल्या देशातील पहिल्या प्रकल्पावर गुरुवारी महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेच्या बाजूने लागला अाहे. नगरपालिकेने गाेलाणी ब्रदर्स यांच्यासाेबत चार मजली मार्केट बांधून त्यातील गाळे विक्री करावे, तसेच पालिकेला सतरा मजली इमारत माेफत बांधून द्यावी, असा करार केला हाेता.
परंतु कालांतराने गाेलाणी ब्रदर्स यांनी गाळे विक्री हाेत नसल्याने ते पालिकेने खरेदी करावे त्याची रक्कम अदा करावी, अशी मागणी केली हाेती. त्यानुसार पालिकेने ठराव करून गाळे खरेदी केले हाेते. यात पालिकेने साडेअाठ काेटींचे अार्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील माजी नगरसेवक छबीलदास खडके यांनी जिल्हाधिकारी, विभागीय अायुक्त राज्य शासनाकडे धाव घेतली हाेती. त्यानंतर अाैरंगाबाद खंडपीठातही पालिकेच्या बाजूने निर्णय लागला हाेता. म्हणून दाेघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
यात खंडपीठाने पुन्हा सुनावणी घ्यावी, असे अादेश झाले हाेते. यात दाेन वर्षांपूर्वी महापालिकेने प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे अादेश खंडपीठाने दिले हाेते. त्यानुसार पालिकेने शासनामार्फत विशेष लेखापरीक्षण करून घेतले हाेते. त्यात शासनाने १२ काेटींचा ठपका ठेवत २३ अाक्षेप नाेंदवले अाहेत. दरम्यान, निकालाबाबत याचिकाकर्ते नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी निकालाबाबत माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले.
याचिकाकर्ते नरेंद्र पाटील छबीलदास खडके यांच्या वतीने अॅड.विनायकराव दीक्षित यांनी तर पालिकेच्यावतीने अॅड.पी.अार.पाटील यांनी तर माजी अामदार सुरेश जैन यांच्यावतीने अॅड. सुबाेध शहा यांनी बाजू मांडली. त्यात व्दिसदस्यीय खंडपीठाने निर्णय देत अाजच्या स्थितीत संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाला अाहे. सतरा मजलीदेखील उभी राहिली अाहे. पालिकेच्या मालमत्तेचे मूल्यही अनेक पटीने वाढले अाहे. त्यामुळे पुन्हा मागे जाता येणार नाही. घड्याळाचे काटे उलटे करू शकत नसल्याचे मत व्यक्त करत याचिका फेटाळली.
अाक्षेप दबावाखाली नाेंदवले गेले हाते
- व.वा.व्यापारी संकुल हा देशातील पहिला बीअाेटी तत्त्वावरील प्रकल्प हाेता. अाज पालिकेची काेट्यवधी रुपयांची मिळकत उभी अाहे. पालिकेवर नुकसानीचा ठेवलेला ठपक्यातील रक्कम वसूल झाले. तत्कालीन अायुक्तांनी दबावाखाली येऊन हे अाक्षेप नाेंदवले हाेते. -नितीन लढ्ढा, महापाैर, जळगाव मनपा