आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनसाखळ्या लांबवणारा निघाला ग्रामपंचायत सदस्य; सट्टय़ाच्या नादात बनला चोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बेरोजगारी, वाईट संगत आणि व्यसनाधिन झालेली व्यक्ती छोट्या, मोठय़ा चोर्‍या करता करता कसा सराईत गुन्हेगार होतो, याची कबुली ग्रामपंचायत सदस्य असलेल्या रवींद्र हरी कापसे (वय 31, रा. शिंदखेडा लपाली, ता. मोताळा, जि. बुलढाणा) याने पोलिसांना दिली. विदर्भातून खान्देशातील जळगाव शहरात येऊन गेल्या दोन वर्षापासून कापसे महिलांच्या सोनसाखळी लांबवून आपले चैनी पूर्ण करत होता.
बारावीपर्यंत शिक्षण झालेलं आणि शेती हा मुख्य व्यवसाय करत असताना गावाच्या राजकारणात सहभाग घेऊन रूतबा म्हणून ओळख असलेल्या रवींद्र कापसे याला सट्टा खेळण्याचा नाद होता. आई, वडील आणि पत्नी हे शिंदखेडा लपाली या गावी शेती व्यवसाय करतात. दोन मुले प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवतात. कापसे हा ग्रामपंचायत सदस्य आहे. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या गरजा भागतील एवढे उत्पन्न निघेल ऐवढी शेती त्याच्याकडे आहे. दरम्यान, रवींद्र कापसेला जवळच असलेल्या मोताळा तालुक्यात जाऊन सट्टा खेळण्याचा नाद लागला. त्यात तो एवढा गुंतत गेला की, त्याच्या कमाईचा पैसाही सट्टय़ात हरत गेला. हळूहळू त्याला सट्टय़ाचे व्यसनच जळले. सट्टा खेळण्यासाठी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला. किरकोळ चोर्‍या करून त्याचा शोक पूर्ण होणे अवघड वाटू लागताच त्याने वाममार्गाने पैसा मिळवता येतो का, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. जळगाव, भुसावळ, जामनेर या शहरात त्याची ये-जा वाढली. त्यात एकदा महिलेची सोनसाखळी लांबवली. त्यातून त्याला पैसा मिळाला आणि त्याची चोरी सापडली देखील नाही. त्यानंतर मात्र त्याने खान्देशातील वेगवेगळ्या शहरात जाऊन महिलांच्या सोनसाखळ्या लांबवायला सुरुवात केली. गेल्या अडीच वर्षांपासून तो सतत महिलांच्या सोनसाखळी लांबवत होता. पण पापाचा घडा भरावा तसा तो पोलिसांच्या हाती लागला आणि पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. आतापर्यंत 27 सोनसाखळ्या चोरल्याचे त्याने कबुल केले. यापैकी 18 महिलांच्या सोनसाखळ्या त्याने जळगावातच लांबवल्या. त्याच्याकडून पोलिसांनी साडेचार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सर्पमित्र वाढे यांच्यासह पोलिसांचा सत्कार
कापसेची चोरी करण्याची पद्धत आगळीवेगळी होती . बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा लपाली येथये राहाणारा कापसे हा 90 किलोमीटरचा प्रवास करून चोरी करत असे. चोरी केल्यानं!र तो माघारी जात असल्यामुळे त्याला पकडणे अत्यंत कठीण बाब होती. शहर, जिल्ह्यातील संशयितांना तपासण्यापलीकडे स्थानिक पोलिसांसमोर कोणताही चेहरा उपलब्ध नव्हता, अशा वेळी केवळ वासुदेव वाढे या सर्पमित्राने दाखवलेली तत्परता आणि हिमतीमुळे आज कापसे गजाआड झाला आहे.
म्हणून करत होता अन्य गावात चोरी
ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे बदनामी नको म्हणून रवींद्र कापसे याने खान्देशात येऊन चोरी करण्याचा निर्णय घेतला. स्वत.ची दुचाकी (क्र.एमएच 28 एस 1396) घेऊन तो सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शिंदखेडा लपाली येथून निघून खान्देशातील जळगाव, भुसावळ किंवा जामनेर येथे तो साडेसात-आठच्या सुमारास शहरात पोहोचत असे. आल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत निर्मनुष्य भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविल्यानंतर तो थेट शिंदखेडा लपाली येथे पळून जात होता.