आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांची मुजोरी, पीएसआयच्या आईचीच सोनसाखळी लांबवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात भरदिवसा होणाऱ्या घरफोड्या, भुरट्या चोऱ्या आणि सोनसाखळ्या लंपास करण्याच्या घटनांमुळे जळगावकर भयभीत झाले आहेत. पोलिसांचा अजिबात धाक नसल्याने चोरटे धुमाकूळ घालत आहेत. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मोहाडी रस्त्यावर शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकाच्या आईची ६३ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसका देऊन लांबवल्याची घटना घडली. शहरात महिनाभरात सोनसाखळी चोरीच्या सात घटना घडल्या असून, त्यात लाख हजार रुपये किमतीच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत पांडुरंग कोसे हे नेहरूनगरात राहतात. मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या आई कामिनी पांडुरंग कोसे (वय ५५) या नेहरूनगरकडून मोहाडी रस्त्याकडे फिरायला गेल्या होत्या. त्या वेळी मागून काळ्या रंगाच्या हीरो होंडा पॅशन-प्रो गाडीने तीन तरुण आले. त्यांनी कोसे यांच्याजवळ मोटारसायकल थांबवली मध्ये बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील ४० ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओढली. त्यात सोनसाखळी तुटली. परंतु, १८ हजार रुपये किमतीचे ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक आणि ४५ हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे मणी लांबवण्यात चोरट्यांना यश आले. चोरट्यांनी मोहाडी रस्त्याने पलायन केले.
पोलिसांचे कुटुंबीयही असुरक्षित
शहरात चोरट्यांची मुजोरी वाढल्यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत. मंगळवारच्या घटनेमुळे सर्वसामान्यांसोबत पोलिसांचे कुटुंबीयही असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. स्वत:चेच कुटुंब सुरक्षित नसल्याने दुसऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी कशी? असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, २२ ते २७ वयाचे चोरटे...महिनाभरातील ७वी घटना...