आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Chain Thefts News In Marathi, Jalgaon Police, Divya Marathi, Crime

सोनसाखळीचोर मोकाट,पोलिस यंत्रणेला खुले आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सलग दुसर्‍या दिवशी जळगावातून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळय़ा पळवल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी 8.30 वाजता भूषण कॉलनीत सिंधुबाई सोपान चौधरी यांच्या गळ्यातील सोनसाखळी पळवण्याचा प्रय} झाला. दरम्यान, पाच पोलिस ठाणे मिळून 47 डिटेक्टिव्ह ब्रॅँच (डीबी) कर्मचारी, तालुका पोलिस ठाण्याचे 11 बीट कर्मचारी आणि ईगल पथकातील 24 कर्मचारी अशा एकूण 82 पोलिस कर्मचार्‍यांचे अपयश या घटनांमधून समोर येत आहे.


विवेकानंदनगरातून सोनसाखळ्या लंपास
मंगळवारी सकाळी 10.30 वाजता विवेकानंदनगरातून आसोदा येथील दीपाली अमोल चौधरी या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पट्टी आणि मंगळसूत्र असा एकूण 94 हजारांचा ऐवज दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पळवला. त्या नातेवाइकांसह बसस्थानकावरून लेवा भवन येथे पायी जात असताना विवेकानंदनगरात दुचाकीवरून दोन जण आले. त्यातील मागे बसलेल्याने चौधरी यांचे केस ओढून एका हाताने गळ्यातील 2 साखळ्या ओढल्या. लगेच ते स्वातंत्र्य चौकाकडून पसार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ ठाण्यात गुन्हा दाखल केला.


पोलिसांचे अपयश
डीबी, बीट आणि ईगल पथकाचे 82 कर्मचारी शहरात तैनात आहेत; मात्र सोनसाखळीचोरीच्या घटनांना अद्याप अंकुश बसलेला नाही. सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या परिसरातून 45 हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली होती. मंगळवारीही चोरट्यांनी तसा एक प्रय} केला. तसेच विवेकानंदनगरातून सोनसाखळी लंपास केली. भरदिवसा घडणार्‍या घटनांमुळे पोलिसांचा धाक संपल्याचे दिसून येत आहे.


2014मध्ये सहा घटना; मात्र एकच उघडकीस
2014मध्ये सोनसाखळय़ा पळवल्याच्या सहा घटना घडल्या. यापैकी अंबिकाबाई झेंडे यांची सोनसाखळी पळवणार्‍यास पकडले आहे. पाच घटनांतील आरोपी सापडलेले नाहीत. सर्व घटनांमध्ये एकूण साडेतीन लाखांचे सोने पळवले आहे.


चोरट्यांचे फुटेज पोलिसांकडे
चोरास महिलांनी ओळखले

पोलिसांनी दुपारी 2 वाजेच्या सुमारास महामार्गावरील हॉटेल साई पॅलेस येथून अजय गारुंगे व बबलू नवले (दोघे रा.तांबापुरा, कंजरवाडा) या संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना दीपाली चौधरी यांच्यासमोर आणले असता, त्यांनी हेच चोरटे असल्याचा दाट संशय व्यक्त केला. तथापि, या चोरट्यांनी दुपारी 12 वाजेच्या सुमारास धरणगाव रेल्वे क्रॉसिंग येथे भास्कर प्रभाकर बर्‍हाटे यांच्या हातातील बॅग घेऊन पळ काढला होता. विनानंबरप्लेटच्या पल्सर मोटारसायकलने ते जळगावकडे येत होते. तसेच पाळधी पोलिसांना मिळालेल्या सूचनेनुसार महामार्गावर त्यांच्यावर पाळत ठेवली होती. पाळधीकडून जळगावकडे येण्यासाठी निघाल्यानंतर गुजराल पेट्रोलपंप परिसरात ड्यूटीवर असलेले वाहतूक पोलिस अनिल पाटील, संदीप पाटील, शशिकांत पाटील आणि नितीन सोनवणे यांनी हॉटेल साई पॅलेस येथे धाव घेतली. हे संशयित आपली दुचाकी एका पानटपरीच्या मागे लावून हॉटेलात गेले होते. याच वेळी वाहतूक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी पळवलेली बॅग आणि त्यातील 4,250 रुपये काढून दिले. दरम्यान, या दोघांची चौकशी सुरू असून, त्यांच्यावर यापूर्वी पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत.

मंगळवारी सकाळी 8.30 वाजता भूषण कॉलनीतील सिंधुबाई चौधरी यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न झाला. या कॉलनीतील एका घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित चोरट्यांचे रेकॉर्डिंग सेव्ह झाले आहे. हे फुटेज दुपारी 3 वाजता दीपाली चौधरी यांना दाखवण्यात आले. आपल्या गळ्यातील सोनसाखळी पळवणारे चोरटे हेच असल्याचे त्यांनी ओळखले आहे. चोरट्यांकडे विनानंबरप्लेटची काळ्या रंगाची दुचाकी होती. चालकाने तपकिरी रंगाचा शर्ट व टोपी आणि मागे बसलेल्याने गुलाबी रंगाचा चेक्सचा शर्ट घातला होता.