भुसावळ- अबकारीकर रद्द करण्याच्या मागणीसाठी सराफा व्यावसायिकांनी दीड महिन्यांपासून बेमुदत बंद पुकारला हाेता. सकारात्मक निर्णय झाला नसला, तरी संघटनेच्या सूचनेनुसार हा बंद तूर्त मागे घेण्यात अाला अाहे. भुसावळातील सराफा बाजार बुधवारी पूर्ववत सुरू झाला. दिवसभरात तब्बल २५ लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला.
भुसावळ हे अाशिया खंडातील द्वितीय क्रमांकाचे रेल्वे यार्ड अाहे. अायुध निर्माणी, वीजनिर्मिती केंद्र यासह हजाराे नाेकरदार या शहरात राहतात. पतसंस्था बुडाल्यानंतर बहुतांश जण साेने खरेदी करून गुंतवणूक करतात. मात्र, गेल्या ४३ दिवसांपासून सराफा बाजार बंद असल्याने सुमारे चार ते पाच काेटींची उलाढाल ठप्प झाली हाेती. मात्र, बुधवारपासून पुन्हा सराफा बाजार गजबजला अाहे. गुरूपुष्यामृताच्या (२१ एप्रिल) मुहूर्तावर साेन्याच्या खरेदीत दुप्पट वाढ हाेण्याचे संकेत अाहेत. लग्नसराईचे दिवस असल्याने गुरुवारी सराफा बाजारात वर्दळ राहील. या पार्श्वभूमीवर सराफा व्यावसायिकांनी अतिशय सूक्ष्म नियाेजनावर भर दिल्याचे जाणवले.
मंगळसूत्र,जाेडवे, साखळी खरेदी :लग्नसराईचे दिवस असल्याने बुधवारी मंगळसूत्र, जाेडवे, साेनसाखळी, नाकातील फुली, साखळीतील मण्यांची खरेदीचे प्रमाण जास्त हाेते. शहरातील कारागिरांकडे कलाकुसरीच्या कामासाठी दागिने टाकलेल्या ग्राहकांनी ते घेण्यासाठी गर्दी केल्याचे िचत्र दिसून अाले. बंद मागे घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी गर्दी वाढल्याने दुकानाबाहेरील सुरक्षारक्षकांनी ग्राहकांची पुरेपूर काळजी घेतली. बहुतांश दुकानांत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंड पाण्याची व्यवस्थाही करण्यात अाली असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
अन्यथा, पुन्हा बंदची हाक द्यावी लागणार.
सराफा असाेसिएशनने केंद्र सरकारने लागू केलेला अबकारी कर रद्द करावा, या मागणीसाठी २३ एप्रिलपर्यंची मुदत दिली अाहे. अन्यथा, पुन्हा बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा दिला अाहे. त्यामुळे मे महिन्यात लग्न असलेल्यांनीही अाताच खरेदीवर लक्ष दिले अाहे. त्यामुळे दिवसभर सराफा बाजार गजबजलेला हाेता.
-सराफा बाजारदीड महिन्यापासून बंद असल्याने मुलीच्या लग्नासाठी दागिने खरेदीची चिंता हाेती. मात्र, हा बंद मागे घेण्यात अाल्याने अडचण दूर झाली. पुन्हा गैरसाेय हाेऊ नये, अशी अपेक्षा अाहे. कुसुम बाविस्कर, ग्राहक,भुसावळ
-ग्राहकांची गैरसाेयहाेऊ नये, म्हणून बंद तूर्त मागे घेतला अाहे. येत्या २३ एप्रिलपर्यंत केंद्र शासनाने हा विषय जर गांभीर्याने घेतला नाही, तर व्यावसायिकांना पुन्हा बंदचा मार्ग अवलंबवावा लागेल. मूलचंद लाहाेटी, सराफाव्यावसायिक, भुसावळ
^तीन दशकांतप्रदीर्घ कालावधीसाठी दुकाने बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ हाेती. हस्तकला साेन्यावर काेरली जाते. धार्मिक महत्त्व असलेल्या या व्यवसायाला सरकारकडून विनाकारण त्रास दिला जाताे. गाेपाळ अग्रवाल, सराफाव्यावसायिक, भुसावळ
- बंद तात्पुरतामागे घेण्यात अाल्याने दिलासा मिळाला. बेराेजगार झालेल्या हातांना काम मिळाले; पण ४३ दिवसांत उत्पन्न बुडाल्याने कर्जबाजारी हाेण्याची वेळ अाली अाहे. पुन्हा अशी वेळ येऊ नये. तुषार वडनेरे, सुवर्णकारागीर, भुसावळ
साेने २९ हजार ४०० रुपये ताेळे
भुसावळात साेन्याचे भाव २९ हजार ४०० रुपये ताेळे (१० ग्रॅम), चांदी ३९ हजार रुपये किलाे हाेेती. तसेच साेन्याचे माेडचे भाव २८ हजार ५०० रुपये ताेळे असे हाेते. बाजारात माेडपेक्षा बुधवारी साेने खरेदीचे प्रमाण जास्त असल्याचे व्यावसायिकांनी चर्चा करताना नमूद केले.