आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या भावात मोठय़ा घसरणीमागे केवळ सट्टेबाजीच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सोन्याच्या भावात चार दिवसांत झालेल्या घसरणीला सट्टेबाजार जबाबदार आहे. सायप्रस देशांनी विक्रीस काढलेले सोने, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी ही तत्कालीन कारणेही घसरणीचा वेग वाढविण्यास कारणीभूत ठरली आहेत. असे असले तरी सोने 25 हजाराच्या खाली जाणार नसल्याची माहिती आर.सी.बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफना यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

सोन्याच्या बाजारपेठेत गेल्या आठवड्यापासून सुरू झालेली घसरणही अभुतपूर्व अशीच आहे. घसरण ही अल्पकाळ राहणारी असल्याने त्याकडे गुंतवणूक म्हणून पाहण्याचा सल्ला आम्ही ग्राहकांना देत असल्याचे बाफना यांनी सांगितले. यापूर्वी 1981 आणि 1990 मध्ये अशाच स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, सोन्याचे उत्पादन मूल्य विचारात घेता सोने यापुढे 25 हजाराच्या खाली येऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.


जळगावातील सोने किंचित महाग
शुद्धता, व्हरायटी आणि स्थानिक कर विचारात घेता जळगावचे सोने मोठय़ा शहरांपेक्षा महाग आहे. मात्र या महागाईतील तफावत 500 ते 700 पेक्षा अधिक नाही. येथील सोन्याची क्रेझ असल्याने दरही थोडे अधिक असतात, दिवसभरात चढ-उतार सुरू होता त्यामुळे गेल्या दोन दिवसात काहीशी अधिक तफावत असल्याचे वृत्त सातत्याने पुढे आले, प्रत्यक्षात तसे नाही. वाहतूक खर्चामुळेही भावात थोडी तफावत असते. मात्र, मोठय़ा शहरात हॉलमार्कसाठी लागणारे वेगळे मूल्य जळगावात लागत नसल्याचे बाफना यांनी सांगितले.