आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचे दर घसरूनही खरेदीत वाढ नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सोन्याच्या भावात दोन ते अडीच हजारांनी घसरण झाली तरीदेखील खरेदीत अपेक्षेएवढी वाढ झालेली नाही. सोन्याचे भाव अजून खाली येतील या आशेने ग्राहक थांबले आहेत, असे सराफांचे मत आहे.
दिवाळीनंतर सोन्याच्या भावात घसरण होत असून, सोने २६ हजारांवर आले आहे. तब्बल दोन ते अडीच हजारांनी सोन्याचे भाव घसरले आहेत. मात्र, सोमवारी सोन्याचे भाव २०० रुपयांनी वाढले. रविवारी सोने २६ हजार ५००, तर चांदीचे भाव ३७ हजार ५०० रुपये होते. दरवर्षाप्रमाणे दिवाळीनंतर सोने खरेदीसाठी गर्दी वाढते. त्यानुसार यंदाही तेवढीच गर्दी असल्याचे सराफांचे म्हणणे असून, भाव घसरल्यामुळे काहीअंशी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. मात्र, पाहिजे तेवढा फरक पडलेला नाही. सध्या बाजारपेठेत चढ-उतार सुरू असल्याने सोन्याचे भाव आणखी घसरतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ग्राहकही खरेदीसाठी भाव कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
खरेदीत कुठलीही वाढ नाही
आंतरराष्ट्रीयबाजारपेठेत झालेल्या बदलांमुळे सोन्याच्या भावात घसरण होत आहे. मात्र, भाव कमी झाल्याने खरेदीत खूप काही वाढ झालेली नाही. दोन दिवसांत सोन्याचे भाव पुन्हा वाढले. -ईश्वरलाल जैन, संचालक,आरएल ज्वेलर्स
भाव अजून घसरण्याची प्रतीक्षा
दरवर्षाप्रमाणेदिवाळीनंतर खरेदीसाठी गर्दी होते. मात्र, यंदा भाव घसरूनही गर्दी वाढलेली नाही. नागरिक खरेदीसाठी सोन्याचे भाव आणखी घसरण्याची वाट पाहत आहेत. सुनीलबाफना, बाफनाज्वेलर्स