नेरी- येथीलबसस्थानकाशेजारी असलेल्या विनोद ज्वेलर्समधून मंगळवारी पहाटे चोरट्यांनी दुकान फोडून साडेचार लाखांचे दागिने लंपास केले. या घटनेने सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहाटे तीन-साडेतीन वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या इंडिका (क्र.एमएच-४४-१००८)तून आलेल्या २० ते २२ वर्षे वयोगटातील चार-पाच अज्ञात चोरट्यांनी विनोद विसपुते यांच्या सराफा दुकानातून चोरी केली. चोरट्यांनी शटरचे सेंटर लॉक दोन्ही बाजूकडील कुलूप टॉमीने तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानाबाहेरील दोन सीसीटीव्ही बंद करून तिघे दुकानात शिरले. १२०० ग्रॅम चांदीचे दागिने, १४० ग्रॅम वजनाचे झुमके, इअरिंग, मंगळसूत्र, फुली आदी साेन्याचे दागिने, ड्रॉवरमधील चाळीस हजार पाचशे रुपये रोख, दागिने ठेवण्याचे ३० बॉक्स असा एकूण सुमारे चार लाख सदोतीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती विसपुते यांनी दिली.
यापूर्वीही दोन वेळा चोरी
विनोदज्वेलर्समध्ये यापूर्वीही दोन वेळा चोरीची घटना घडली आहे. सततच्या चाेऱ्यांमुळे दुकानमालक विसपुते हे पूर्णत: खचले आहेत. २९ जानेवारी २०१० रोजी ४० हजारांची चोरी झाली होती. तसेच मे २०१३ रोजी दुकानातून पैसे घरी घेऊन जात असताना विनोद विसपुते यांचे वडील भगवान विसपुते लहान भाऊ संजय यांच्यावर प्राणघातक हल्ला करून हातातील मालाची पिशवी चाेरट्यांनी हिसकावून नेली होती. त्या पिशवीत जवळपास अर्धा किलो सोने चांदी असा एकूण २५ लाखांचा ऐवज होता. सुदैवाने या हल्ल्यातून पिता-पुत्राचे प्राण वाचले होते. मात्र, या दोन्ही घटनांचा पोलिसांकडून अद्यापही तपास लागलेला नाही.
गौरी गोंधळली
पोलिसठाण्याचे निरीक्षक रफिक शेख यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण केले असता, गौरीनामक श्वानाला घटनास्थळी आढळून अालेल्या टॉमीचा वास देण्यात आला. मात्र, गौरी एकाच ठिकाणी घुटमळत राहिली. रात्री अतिरिक्त अधीक्षक संदीप जाधव यांनी माहिती घेतली.
वॉचमनचा हलगर्जीपणा
बसस्थानकाजवळीलजिल्हा बँक शाखेच्या वॉचमनला मंगळवारी रात्री गस्त घालत असताना एक संशयित गाडी दिसली. तो त्या गाडीजवळ गेला असता, गाडी सुरू होऊन थोड्या अंतरावर जाऊन थांबली. त्याने पुन्हा पाठलाग केला असता, ती लांब अंतरावर जाऊन थांबली. मात्र, त्यानंतर वॉचमन दुसरीकडे निघून गेल्यानंतर दुकानात चोरीची घडना घडली. वॉचमनने पोलिसांना वेळीच फोन केला असता, तर चोरीची घटना घडली नसती.
दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला
विनोदज्वेलर्समधून चोरी केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा आनंद ज्वेलर्स सुधाकर दौलत सराफ यांच्या दुकानांकडे वळवला. आनंद ज्वेलर्सबाहेरील सीसीटीव्हीची केबल तोडून कॅमेरे बंद केले. मात्र, त्यांना आत प्रवेश करता आला नाही. तसेच सुधाकर सराफ यांच्या दुकानाच्या चॅनल गेटचे कुलूपही तोडले; परंतु या ठिकाणी चोरट्यांचा डाव फसला.
चोरटेदुकानातील कॅमेऱ्यात कैद
चोरटेदुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र, त्यांनी चोरी करताना चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. तीन जण माल काढून बाहेर ठेवताना दिसत आहेत.