आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्याजवळ 16 कोटींचे 58 किलो सोने हस्तगत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने रविवारी 58 किलो 900 ग्रॅम सोने जप्त केले. बाजारात 16 कोटी 87 लाख किंमत असलेले हे सोने शिरपूरच्या झी गोल्ड रिफायनरीतून मुंबईच्या बाजारात नेण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

एका कारमध्ये सोन्याची बिस्किटे असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने सोनगीर टोलनाक्याजवळ कार अडवली तेव्हा चालकाने झडतीस नकार दिला. त्यामुळे पोलिस ठाण्यात वाहन आणले. निवडणूक काळात हे सोने सापडल्याने तर्कवितर्क सुरू होते.

आमचा संबंध नाही : अमरीश पटेल : शिरपूरमध्ये उभारलेल्या सोन्याच्या कारखान्याची दोन वर्षांपूर्वी झी ग्रुपचे सुभाष गोयल यांना विक्री केली आहे. त्यामुळे आता आमचा संबंध नसल्याचे उद्योगपती व काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अमरीश पटेल यांनी सांगितले. त्याच्याशी पटेल ग्रुपचा कुठलाही संबंध राहिलेला नाही.

वाहतूक कायदेशीरपणे
कायदेशीर मार्गाने सोने मुंबईला नेले जाते. आमच्याकडे पावत्याही आहेत. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर असल्यामुळे आयकर विभागाच्या चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत.आम्हाला निश्चित क्लिन चीट मिळेल. सुभाष पारेख, मॅनेजर गोल्ड रिफायनरी