आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफांचा बंद; दाेन दुकाने सुरू, विविध मागण्यांसाठी सुवर्णकारांनी पुकारलेला बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अर्थसंकल्पात साेने दागिन्यांवर लावलेल्या अबकारी करासह विविध मागण्यांसाठी सुवर्णकारांनी पुकारलेला बंद शनिवारीही सुरूच हाेता. मात्र, दाेन सुवर्णपेढ्या सुरू ठेवल्या हाेत्या. दरम्यान, दुपारी व्यापारी कारागिरांनी शर्ट काढून अांदाेलन केले.

शहरातील सर्वात जुनी सुवर्णपेढी अार.एल.ज्वेलर्स गायत्री ज्वेलर्स सुरू हाेते. गायत्री ज्वेलर्स सुरू असल्याची माहिती मिळताच सराफा व्यावसायिकांनी जाऊन त्यांना बंदमध्ये सहभागी हाेण्याबाबत सांगत दुकान बंद करण्यास सांगितले. त्या वेळी दुकान बंद केले. मात्र, पुन्हा सायंकाळी सुरू झाले. या वेळी अार.एल.ज्वेलर्सचे अर्धे शटर उघडे हाेते. तसेच तुरळक ग्राहक व्यवहारांसाठी येत हाेते. बंदमध्ये अार.एल. ज्वेलर्सचा सहभाग असून त्यांचा बंदला पाठिंबा अाहे. त्यामुळे अर्धे शटर बंद ठेवले हाेते. परंतु, बाहेरगावाहून अालेल्या ग्राहकांना काही प्रमाणात सेवा उपलब्ध करून दिल्याचे अार.एल. व्यवस्थापनाने सांगितले. तसेच १० मार्च रोजी पुणे येथे राज्यभरातील सुवर्णकारांच्या माेर्चात जिल्हाभरातून २५० व्यापारी पुण्याला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष गाैतम लुणिया यांनी सांगितले.

शर्ट काढून अांदाेलन
शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये ४०० आंदाेलनकर्त्या सराफा व्यावसायिकांनी शर्ट काढून अांदाेलन केले. त्याचे फाेटाे व्हाॅट्सअॅपवर अाले. त्याचे अनुकरण करत शहरातील सुवर्णकार कारागिरांनीही शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शर्ट काढून अांदाेलन केले.
विविध मागण्यांसाठी शनिवारी शर्ट काढून अांदाेलन करताना शहरातील सुवर्णकार कारागीर.