आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुवर्णकार समाजाच्या भुसावळातील वधू-वर परिचय मेळाव्यात 700 विवाहेच्छुकांचा सहभाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ: सुवर्णकार समाज सुशिक्षित वर्गात मोडणारा आहे. समाजातील मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून भविष्यासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. वरपक्षाने हुंड्यासाठी आग्रह धरू नये, असे आवाहन आर.के.सोनार यांनी सुवर्णकार समाजाच्या जीवनसाथी वधू-वर परिचय मेळाव्यात केले. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश राजस्थानमधील विवाह योग्य 700 तरुणांनी या मेळाव्यात परिचय करून दिला. सुमारे चार हजार समाजबांधवांची उपस्थिती होती.
शहरातील संतोषी माता बहुउद्देशिय संस्थेच्या सभागृहात रविवारी सुवर्णकार समाज उत्कर्ष मंडळ जळगाव, नवअहिर सुवर्णकार मंडळ भुसावळ आणि अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था जळगावतर्फे अहिर सुवर्णकार समाजासह इतर पोटशाखांसाठी जीवनसाथी वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाचे हे तिसरे वर्ष होते. आर.के.सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात सुमारे 700 युवक-युवतींनी परिचय करून दिला. नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी आमदार अँड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तर नामदेव महाराज भामरे यांच्या हस्ते संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर आर.के.सोनार यांनी मार्गदर्शन केले. समाजातून हुंड्याची प्रथा बंद व्हावी, यासाठी प्रयत्न आहेत. वर पक्षाने हुंड्याची मागणी करू नये, असे ते म्हणाले. वधू-वरांची संपूर्ण माहिती असलेल्या वधू-वर परिचय पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सुधाकर कृष्णाजी सोनवणे, गणेश दुसाने, राजेश वानखेडे, सावद्याच्या माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे, रेखा वानखेडे (सर्व सावदा), भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनील दुसाने यांच्यासह मेळाव्याचे निमंत्रक गुलाबराव बाविस्कर, डॉ.राजेंद्र पिंगळे (अमळनेर), नितीन सोनार (पारोळा), पूजादेवी पिंगळकर (पारोळा), सुशीला सोनार (भुसावळ), पंडित वानखेडे (सुरत), वसंत बागुल (अहमदाबाद), गंगाधर जगताप (बडोदा) यांच्यासह कोलकाता येथून आलेल्या समाजबांधवांची उपस्थिती होती. सुनील सोनार यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याच्या आयोजनामागील मुख्य भूमिका स्पष्ट केली. मेळावा यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी पर्शिम घेतले.